काश्मीर पहेलगाम घटनेच्या निषेधार्थ पाचोरा बंदला उस्फुर्त प्रतिसाद,सकल हिंदू समाज संघटनांनी पाकिस्तानचा पुतळा जाळून केला निषेध.

9

 प्रतिनिधी शेख जावीद
जम्मू-काश्मीरमधील हिंदू पर्यटकांवर काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम बैसरन येथे पाकिस्तानने पोसलेल्या टीआरएफ दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय हिंदू वंशाचे २८ ठार झाले या घटनेने देशात पाकिस्तानी राज्यकर्ते आणि अतिरेक्यांच्या विरोधात देशवासीयांमध्ये प्रचंड संताप आणि बदला घेण्याची मागणी आहे त्या अनुषंगाने पाचोरा येथे सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे जारगाव चौफुली हायवे पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि भर चौकात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत प्रतीकात्मक पुतळा फुंकण्यात आला पाचोरा बंदला उस्फुर्त प्रतिसाद जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज २ मे रोजी सकाळ पासुनच पाचोरा शहरातील कडकडीत बंद पाळण्यात आला.हा बंद विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आला होता अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी दुकानदार आणि नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी १० वाजता जारगांव चौफुलीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पाकिस्तानी आतंकवाद मुर्दाबाद“पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले मोर्चाच्या समारोपस्थळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर पाकिस्तानचा पुतळा जाळून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी पाचोरा शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला असून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.