शेंदुर्णी दूरक्षेत्र पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी. टायर मार्क्स वरून वाहन व आरोपीचा शोध ..

11

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर – 

दिनांक 16/06/2025 रोजी पहूर शेंदुर्णी रोड वर एक भिषण अपघात झाल्याने त्यामध्ये एक MD महिला डॉक्टर स्नेहल रावते (पेंढारकर )यांचा मृत्यू झाला होता. अपघात करणारा वाहन चालक वाहानासह फरार झाल्याने पोलिसांसमोर आरोपी व वाहन निष्पन्न करणे एक मोठे आव्हान निर्माण झाले होते. सदर अपघातामध्ये कोणताही प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार नव्हता तसेच cctv पुरावा नव्हता आशावेळी शेंदुर्णी चे पोलीस उप निरीक्षण नंदकुमार शिंब्रे व त्यांच्या पथकाने सर्व बाजूने सलग 24-30 तास तपास करून घटनेची सखोल माहिती घेतली व 40-50 वाहनांची चौकशी केली.तपासातून सदर वेळेत 4-5 वाहने पहूर ते शेंदुर्णी रस्ताने गेल्याचे तपासातून समजले.परंतु नेमके वाहन कोणते हा प्रश्न उनुत्तरीत होता. तेव्हा तपासी अधिकारी नंदकुमार शिंबे यांनी फॉरेन्सिक टीम बोलावून घटनास्तालावरील नमुने व टायर मार्क्स घेतले व सावंशयित सर्व वाहणांची फॉरेन्सिक टीम कडून तपासणी केली तेव्हा अपघात करणाऱ्या वाहणाचा शोध लागला. सदरचे डम्पर धनराज मोरे रा. टाकली जामनेर यांचे MH19Ek4102 असल्याचे निष्पन्न झाले. परंतु सदर वाहनाचा चालक व हेल्पर अपघात झाल्यापासून फरार होते त्यांना cdr द्वारे शोधून चालक आरोपी सुनील बिसन रेस्वाल रा. रावळा ता सोयगाव जि. छ. संभाजीनगर याला दिनांक 19/06/2025 रोजी सकाळी 05:00 वा अटक केली तसेच आरोपी हेल्पर नाव सुरज यादव रा झारखंड हा फरार असून त्याचा शोध पोलीस पथक घेत आहे.

सदरची कामगिरी शेंदुर्णी पोलीस दुरक्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे, पोशी / गुलाब पवार, नरेश घाडगे यांनी पहूर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी Api प्रमोद कठोर, उप विभागीय अधिकारी पाचोरा धंनजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.