मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल शेंदुर्णी येथे मुख्याध्यापक म्हणून खान शरीफ यांची नियुक्ती

9

स्टार एटीन न्यूज

शेख हमीद – शेंदुर्णी येथील आदर्श व कर्तव्यदक्ष शिक्षक समाजसेवी व्यक्तिमत्त्व तसेच मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल मधील सर्वात सिनियर मुख्याध्यापक पदासाठी पात्र असलेले खान शरीफ अब्दुल्ला यांची मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल शेंदुर्णी येथे अधिकृत व कायदेशिर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत दि. 24/06/2025 रोजी शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण जि. प. जळगाव यानी नियुक्तीचे लेखीपत्र देऊन पुढील कारवाही करण्याचे आदेश दिले आहे त्या नुसार शरीफ सर यांनी पदभार स्वीकारला आहे .

खान शरीफ अब्दुल्ला यांनी मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल शेंदुर्णी येथे अविरत 28 वर्ष सेवा केली आहे योग्य व्यक्तिला हे पद दिल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले आहे आता शरीफ सर आपल्या कामातून मुलांची व हायस्कूल ची प्रगती करतील अशी सर्वाना अपेक्षा आहे यापूर्वी चे मुख्याध्यापक अबरार सर यांनी आपल्या कारकिरदित अत्यंत चागली सेवा दिली आहे ते नुकतेच रिटायर झाल्याने हे पद रिक्त होते त्यांच्या जागी अब्दुल रहेमान सर यांची नियुक्ती झाल्याची बातमी देण्यात आली होती परंतु त्या नियुक्तीवर संबधित यानी हरकत घेतल्याने ती रद्द झाली आहे . मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल मधे खान शरीफ सर यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्तीसाठी पाठपुरावा करून अधिक परिश्रम संस्थेचे कार्यरत संचालक मंडळ यांनी घेतले आहे ,

हाजी नबी शाह , हाजी असलम ,फरीद पठाण , खलील दादा , भैय्या शेठ , शकुर शेख तसेच मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल मधील शिक्षकेस्तर कर्मचारी व शेंदुर्णी येथील ग्रामस्थ यानी शरीफ सर यांचे हार्दिक स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहे .