विश्व हिंदू परिषदे तर्फे शेंदूर्णी येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न, दोन महिलेंसह ८३ व्यक्तींचा सहभाग

1200

डॉ. नीलम कुमार अग्रवाल, शेंदूर्णी, ता जामनेर :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ,
रविवार दि १६ ऑगस्ट रोजी शेंदूर्णी येथे अखंड भारत संकल्प दिन व विश्व हिंदू परिषदेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय स्व. श्री अटल बिहारी वाजपेयींच्या पुण्यस्मरणानिमित्त पू. श्री माधवराव गोळवलकर रक्तपेढी जळगावच्या माध्यमातून ममता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वाचनालय चौक शेंदूर्णी येथे राणी लक्ष्मीबाई सह पतसंस्थेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले होते.
भारतमाता व श्रद्धेय स्व अटलजींच्या प्रतिमेचे सहा. पोलीस निरीक्षक बर्गे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव थोरात, विहिप प्रांत समरसता प्रमुख वामनराव फासे ममता हॉस्पिटलचे डॉ. चेतन अग्रवाल, डॉ. पूजा अग्रवाल, डॉ. मयुरी अग्रवाल व रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी अर्जुन राठोड यांच्या हस्ते सकाळी १० वाजता प्रतिमा पूजन करून शिबिराचे विधिवत उदघाटन करण्यात आले. सदर शिबिरात कोरोना महामारीच्या नियमानुसार सामाजिक दुरीचे सर्व नियम पाळून दोन महिलांसह एकूण ८५ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना आयोजकांकडून मास्क तर ममता हॉस्पिटलकडून सिद्धजल काढायचे वितरण करण्यात आले. शिबिरस्थानी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष गोविंदजी अग्रवाल, शहर डॉक्टर असोशियनचे अध्यक्ष देवानंद कुलकर्णी, विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार, नगरसेवक इतर मान्यवरांनी भेटी दिल्या. शिबीर यशस्वीतेसाठी विहिप प्रांत समरसता प्रमुख वामनराव फासे, अजय जहागीरदार, , प्रदिप गुजर, सुनील गावंडे, निलेश थोरात, अभिषेक अग्रवाल, अतुल जहागीरदार रवींद्र सूर्यवंशी, मयूर माळी, अतुल पाटील, नितीन शेटे, प्रज्वल धुमाळ, सतीश बारी, भागवत राऊत, सुबोध गुजर, विशाल शिंपी, सुनील गुजर,भूषण दामधर, किशोर वाघ, भीका इंदरकर, आकाश माळी, घनश्याम माळी, संदीप साखला, मोतीलाल माळी, किशोर चौधरी, सचिन गुजर, गोपाल धनगर, कडोबा चौधरी तसेच ममता हॉस्पिटल स्टाफ यांनी परिश्रम घेतले.