ग्रामपंचायत निवडणूक कर्तव्यावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सोय उपलब्ध करून द्या

485

 

शिक्षक समितीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

खुलताबाद / प्रतिनिधी

दिनांक 15 जानेवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका संम्पन्न होत आहेत.या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.सदरील मतदान अधिका-यांपैकी मतदार असलेल्या शिक्षक व कर्मचा-यांना पोस्टल मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही.त्यामुळे सदरील शिक्षक व कर्मचारी मतदानाच्या पवित्र हक्कापासून व कर्तव्यापासून दुरावणार आहेत.करीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार व मा.तहसिलदार लाड साहेबांना एका निवेदनाद्वारे पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्याची मागणी केली त्याच बरोबर मतदानाचे मानधन निवडणूकीच्या दिवशीच कर्मचा-यांना देण्यात यावे.
बी एल ओ कामाबाबत सक्ती करण्यात येऊ नये. बी.एल.ओ चे थकीत मानधन तात्काळ अदा करण्यात यावे.आदी मागण्या निवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी व तहसिलदार साहेंबांकडे करण्यात आल्या.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय साळकर,जिल्हा सरचिटणीस रंजीत राठोड, प्रसिद्धीप्रमुख सतीश कोळी, तालुकाध्यक्ष कडुबा साळवे, अंकुश वाहूळ, विलास बापू चव्हाण, बबन चव्हाण, कैलास ढेपले, दत्ताभाऊ खाडे, जावेद अंसारी, आदिं पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.