भगवान भोजने यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान

456

खुलताबाद प्रतिनिधी , मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या मार्फत राज्यातील सामाजिक , राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना संस्थेतर्फे सन्मानित करण्यात येते यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्धल श्री संत जनार्दन स्वामी प्राथमिक गुरुकुल वेरूळ येथील सहशिक्षक भगवान एकनाथ भोजने यांना पुरस्कार जाहीर झाला होता तर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी धर्मपीठाचे उत्तराधिकारी संस्थेचे अध्यक्ष श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव गणेशजी बोराडे , आश्रमीय संत ब्र रामानंदजी महाराज , उद्योजक नाना कारभार , माजी सरपंच प्रकाश पाटील मिसाळ , दयानंदजी फुलारे , सदस्य कुणालजी दांडगे , जितेंद्र हजारी , अंकुशजी जाधव , जनार्दन रिठे अण्णा, विद्यालयाचे प्राचार्य श्री दवंगे गुरुजी , प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ताले , विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री अधाने गुरुजी , कोटकर गुरुजी , श्री पगार गुरुजी व गुरुकुलातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सर्वांनी पुरस्काराबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या