शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन उत्सवात , २०११-१२ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेला क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची प्रतिमा भेट
आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड महाविद्यालयात सन २०११- १२ माजी विद्यार्थ्यांचा दिनांक: ६/५/२०२५ वार- मंगळवार रोजी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम बापूसो गजाननराव गरुड यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास व हरिप्रसाद महाराज यांच्या पुतळ्यास शाळेचे मुख्याध्यापक एस आर चौधरी सर तसेच इयत्ता दहावीचे सेवानिवृत्ती वर्गशिक्षक व्हि.बी.पाटील सर,जी. व्हि.महाजन सर यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फुल देऊन शाळेत प्रवेश दिला.२०११- १२ च्या विद्यार्थ्यांनी शाळेला क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची भेट देऊन सन्मानित करण्यात आले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न,भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले.तसेच उपस्थित शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत सपकाळे यांनी केले तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे उपस्थित शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक एस आर चौधरी सर यांनी मार्गदर्शन करताना आपल्या आई-वडिलांना सांभाळा तसेच आपल्या सासू-सासरे यांना सांभाळा वृद्धाश्रमाची त्यांना पायरी चढवून देऊ नका असा अनमोल विचार त्यावेळी मांडला. तसेच मुख्याध्यापक एस आर चौधरी पर्यवेक्षक शिरपुरे सर माजी वर्ग शिक्षक व्हि.बी पाटील सर,जी.व्हि.महाजन सर, डी.बी.पाटील सर, संजय पाटील सर,पी.पी.पाटील सर, आबा पाटील सर, शिंदे मॅडम व आर.के.गरुड सर यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल सपकाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागवत सपकाळे,शुभम वाघ,राहुल सपकाळे,कमलेश पाटील,अश्विनी मनोरे,भारत जाधव,अश्विन जोहरे,संदीप चव्हाण,राहुल राजपूत,ज्योती चौधरी,सारिका महाले,गीता बारी,भावना सपकाळे,अश्विनी बेलदार,पल्लवी तुपे,दीक्षा शेटे,योगेश चोंडीये,अमोल मोरे,दीपक कुमावत,अविनाश नाईक इत्यादींनी मेहनत घेतली.