जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे खा.रक्षाताई खडसे यांनी पीक विमा संदर्भात बँक अधिकारी व कृषीधिकारी यांची घेतली बैठक

133

 

बुलढाणा प्रतिनिधी – जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे खा.रक्षाताई खडसे यांनी पीक विमा संदर्भात बँक अधिकारी व कृषीधिकारी यांची बैठक घेतली.संबधित बैठकीमध्ये लोकसभा रावेर मतदार संघात येणाऱ्या नांदुरा व मलकापूर (तालुका) तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्या संदर्भात असलेल्या अडचणींवर चर्च्या करण्यात येऊन लवकरात लवकर संबधित अडचणी दूर करण्याच्या सूचना अधिकारी वर्ग याना देण्यात आल्या.तसेच पिक विमा योजनेची शेतकऱ्याकडून विचारपूस केल्यावर अस लक्ष्यात आले की, बुलढाणा जिल्ह्यात खूप कमी प्रमाणात शेतकरी पीक विमा काढतात असे दिसून आले आणि अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानाला सरकार कडून होणाऱ्या मदतीस शेतकरी मूकतांना दिसून आले.
केंद्र सरकारची पंतप्रधान पीक विमा योजने संर्भात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना तळागाळा पर्यंत योजनांची माहिती पुरवावी यासाठी बँकांमध्ये सूचना फलक लावण्याचे निर्देश खा.रक्षाताई खडसे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले.सदर बैठकीला जिल्हाअधिकारी बुलढाणा श्री.एस.रामामुर्ती
संबधित कृषीअधिकारी, बँकअधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.