शेंदूर्णी येथे रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

29

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी
येथे दि.7 मे 2024 रोजी श्री संत रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने सकाळी संत रोहिदास महाराज यांच्या मंदिरात जाऊन समाज बांधवांनी संत रोहिदास महाराज यांच्या मुर्तीं अभिषेक व पुजन केले.संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रात्री सुश्राव्य किर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले,किर्तनाची सेवा ह भ प गोपाळ महाराज चिमठाणेकर, यांनी *काय सांगू आता संतांचे उपकार | मज निरंतर जागविती ||
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई! या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण केले यावेळी
यावेळी संत रोहिदास महाराज यांचे वाराणसीतील जन्मापासून तर पंढरपूर पर्यंतच्या वारी पर्यंत चा प्रवास महाराजांनी विस्तृत वर्णन केला,संतांची चरित्र रात्र सरली तरी संपणार नाही, कितीही दिवस आपण संतांची चरित्र सांगितले दिवस पुरणार नाही ,संत रोहिदास महाराज यांचे मुघलांच्या काळातील जीवनातील चरित्र,संत मीराबाईंच्या विनंतीवरून चित्तोडगढ येथे महाराजांनी समाधी घेतली इथ पर्यंतचे वर्णन सविस्तर सांगितले
समाज बंधू-भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती
सदर पुण्यतिथी सेवा व्यवस्थित पार पाडण्यासाठी समाजाचे अध्यक्ष सदस्य, यांच्यासह समाजातील सर्व बांधवांनी सेवा पार पाडली .