लोकसभा निवडणुकीत शेंदुर्णी शहरातील नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावे – मुख्याधिकारी साजिद पिंजारी

115

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर – 
मा. जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूक २०२४ करिता शेंदुर्णी शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी प्रयत्न म्हणून मा. मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी आज दि. ९ मे २०२४ रोजी शेंदुर्णी नगर पंचायत सभागृहात शहरातील बचत गटाच्या महिला ,आशा सेविका , अंगणवाडी सेविका यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस मुख्याधिकारी साजिद पिंजारी व कार्यालयीन अधीक्षक शरद कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. शहरातील मतदान केंद्रावर बालसंगोपन केंद्र आरोग्य केंद्र विषयी पूर्वतयारी आढावा घेण्यात आला. महिला बचत गटातील महिलांना समूहाने १००% मतदान करण्यास आवाहन करण्यात आले आपल्या गटातील मतदाराची टक्केवारी १००% झाल्यास १०० गुण, ८६ ते ९५ टक्के झाल्यास ७५ गुण , आणि ८५% मतदान झाल्यास ५० गुण अशाप्रकारे गुणांकन असणार असणार आहे. यात गुणांकानुसार प्रथम बक्षीस सुवर्ण प्रमाणपत्र द्वितीय बक्षीस रजत प्रमाणपत्र आणि तृतीय बक्षिस कास्य प्रमाणपत्र असणार आहे. तसेच शहरातील इतर महिलांना मतदान करून लोकशाही बळकट करून देशास सहकार्य करावे.
सदर बैठकीस शहरातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच शनेश्वर महिला बचत गट,विकास महिला बचत गट, परिवर्तन महिला बचत गट,दूर्गाई महिला बचत गट कोळेश्वर महिला बचत गट इतर महिला उपस्थित होत्या.