गरुड विद्यालयाचे मु./प्राचार्य एस.पी.उदार सेवानिवृत्त

420

शेंदुर्णी – आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे,
प्राचार्य /मु. एस.पी.उदार यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष भीमराव शेळके.संस्थेचे सचिव सागरमल जैन,सहसचिव यु.यु.पाटील, माजी मुख्याध्यापक डब्ल्यू एस पाटील,शांताराम गुजर,सुधाकर बारी, निलेश थोरात, राजेंद्र दादा पवार धीरज जैन योगेश गुजर डी आर शिंपी एस.एस. उपेंद्र जैन अशोक माळी कृष्णराव शेळके उत्तमराव शेळके डॉक्टर देवेंद्र शेळके सुरेंद्र शेळके शिक्षण विस्तार अधिकारी काळे साहेब केंद्रप्रमुख राठोड पत्रकार संघाचे विलास अहिरे देवेंद्र पाडळकर,नीलमकुमार अग्रवाल, दिग्विजय सूर्यवंशी त्याच बरोबर सरांच्या आई शकुंतला उदार, धर्मपत्नी चित्रा उदार इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी ह.भ.प.हरिप्रसाद महाराज आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड,
अण्णासाहेब भास्करराव गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शैलेंद्र शेळके यांनी संस्थेचे चेअरमन संजय गरुड व कार्यालयीन सचिव दीपक गरुड, प्रा. सुनील गरुड यांच्या भ्रमणध्वनीद्वारे प्राप्त झालेल्या शुभेच्छा सह उदार यांच्या बालपणांच्या आठवणींपासून तर त्यांच्यासोबत एक उत्तम सहकारी,उत्तम प्रशासक म्हणून जी कामगिरी बजावली त्यांच्या कार्याचा गुणगौरव आपल्या प्रास्ताविकात शेळके यांनी केला.

तद्नंतर विद्यार्थी मनोगतात वैष्णवी काबरा,शिक्षक मनोगतात व्ही डी पाटील, श्रीमती.के.डी पाटील,डी एस वारांगणे आप्तेष्टांच्या वतीने सरांच्या भगिनी अश्विनी देशपांडे व मुलगी कुमारी शितल उदार यांनी मनोगत व्यक्त केले तसेच पत्रकार देवेंद्र पारळकर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेचे सचिव सागरमल जैन यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, एस पी उदार खरोखर कार्यतत्पर मुख्याध्यापक आहेत याची प्रचिती त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली. कुठेही ओढुन ताणून आणलेले विचार कोणत्याही शिक्षकांनी आपल्या मनोगतातून मांडतांना दिसून आले नाहीत याच गोष्टीचा खरा अभिमान वाटतो. त्याचबरोबर सरांचे एन.सी.सी. ऑफिसर म्हणून असलेलं कार्य देखील उल्लेखनीय होते.ते या ठिकाणी विसरून चालणार नाही त्यांच्या वक्तृत्वात आई सरस्वती त्यांच्या जिभेवर थुई थुई नाचत असे,त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणात भीमराव शेळके म्हणतात की, संजय उदार यांनी शालेय प्रशासनात जबाबदारी पार पाडली असून वेगळे काम जरी केले नसले तरी, या माणसाने प्रशासन सांभाळत असतांना माणसं जोडण्याचे काम केलं;माणसाने माणसाशी माणसासम वागणे या ऊक्तीला पुरेपूर न्याय दिल्याचं लक्षात येतं.या शब्दांनी त्यांनी आपल्या मनोगतातून गौरव उद्गगार काढले.
या निमित्ताने माजी मुख्याध्यापक एस के राठी,व्हि.के.चौधरी,पर्यवेक्षक जे एस जुबंळे,विनोद पाटील,विद्यालयाचे उप मुख्याध्यापक एस व्ही शिंदे यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.जी.पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.