गरुड महाविद्यालयात “मिशन युवा स्वास्थ्य” अतंर्गत कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर

605

प्रतिनिधी शेंदुर्णी –  अ.र.भा.गरुड कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो (राष्ट्रीय सेवा योजना) एकक,विद्यार्थी विकास विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने “मिशन युवा स्वास्थ्य” अतंर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयोजित कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. यात महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी पहीला व दुसरा डोस घेतला.

सदर लसीकरण शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर.पाटील हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी सद्यस्थितीतील या लसीकरणाचे महत्व मांडले. तसेच वाढत्या लसीकरणामुळे कोविड-19 धोका नक्की कमी होत असल्याचे प्रतिपादन केले व तरुणांनी जास्तीत जास्त लसीकरण शिबिरांना प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. या लसीकरणासाठी शेंदूर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जोहरे, डॉ.सचिन वानखेडे आरोग्य सहाय्यक गजानन माळी, श्रीमती राजश्री पाटील,काजल आढे,अनुरत रहाडे, व लॅब टेकनिशीअन म्हणून कल्पेश यांचे अनमोल सहकार्य केले.

यात शिबिरात एकूण 49 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.यात कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोघेही लसी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.लसीकरणा आधी विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट सुद्धा वैद्यकीय पथकाकडून घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
या शिबिरास महाविद्यालयाचे उपप्राराचार्य प्रा.एन.एस.सावळे, प्रा.डॉ.संजय भोळे, प्रा.डॉ.श्याम साळुंखे यांच्यासह प्रा.डॉ.प्रशांत देशमुख, प्रा.अमर जावळे, प्रा.डॉ.आर.डी.गवारे, प्रा.डॉ.महेश आर.पाटील, प्रा.डॉ.भूषण पाटील,श्री.धम्मा धारगावे, प्रा.संदीप द्राक्षे, प्रा.राहुल गरुड, प्रा.निलेश बारी,
प्रा.वर्षा पवार, प्रा.प्रतीक्षा गायकवाड, प्रा.निकिता गरुड, कार्यालय अधीक्षक सतीश बाविस्कर,वरिष्ठ लिपिक श्री.हितेंद्र गरुड, सेवक बशारत तडवी यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.ए.एन.जिवरग, रासेयो सहाययक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे,रासेयो महिला सहाययक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील,सहाययक प्रा.डॉ.महेश आर.पाटील,विद्यार्थी विकास अधिकारी,महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.योगिता चौधरी यांनी परिश्रम घेतले. रासेयो स्वयंसेवक सचिन कुंभार, ज्ञानेश्वर धनगर, व्यंकटेश उपाध्ये यांनी आयोजनात सहकार्य केले.
तर या मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी ही हजर होते.