राजू जाधव यांना सामाजिक क्षेत्रातील युवा सेवा गौरव पुरस्कार जाहीर

155

प्रतिनिधी औरंगाबाद – 

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रातील राजू जाधव यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२१ गुरुवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.माणुसकी समुहाच्या पाचव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा- सकाळी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी पहूर येथील रहिवासी तथा उपसरपंच राजू जाधव यांना सामाजिक युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
लहानपणापासून डॉक्टर होण्याची जिद्द व चिकाटी अंगी बाळगून शिक्षण सुरू केले परंतु एका आघातामुळे डॉक्टर हे स्वप्न अपूर्णच राहिले.तरीसुद्धा आरोग्य क्षेत्रात आपली मदत घडावी या उद्देशाने नेहमीच रुग्णांना मदत करण्यासाठी अग्रेसर राहत असत़ो, यानंतर राजकारणात सक्रिय सहभाग घेतला राजकीय सक्रियतेतून समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत योजना पोहचविण्यासाठी तत्पर राहून सेवा देण्याचा प्रयत्न नेहमीच सहकार्योची भावना , रूग्णसेवा करणे, जेष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला,विधवा महिलांना तसेच अपंग व्यक्तींना लाभ मिळवून दिला, तसेच तरूणांना स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका सुरू करण्यासाठी वरिष्ठांकडे कडे पाठपुरावा करून मंजूर करण्यात आली, तसेच तरुणांना व्यायाम शाळा निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करून अंतिम टप्प्यात काम सुरू आहे उपसरपंच म्हणून पहूर कसबे ग्रामपंचायतीला तरूण तडफदार उपसरपंच मिळाले,सतत राष्ट्रविषयी प्रेम, सदोदित समाजाच्या प्रत्येक व्यक्तिला मदत करण्यासाठी अग्रेसर असणारे राजू जाधव जगावर कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असताना माणूस माणसापासून दुरावला असताना राजू जाधव हा तरुण आपल्या जिवाची कुठलीच पर्वा न करता देता येईल ते मदत करण्यासाठी तत्पर झाले .
सेवा परमो धर्म या उक्तीप्रमाणे प्रत्येक कोविड रूग्णांना प्रयत्न पोहचून सुविधा दिल्या,कोविड सेंटर सुरू करण्यात तेथे रुग्णांना जेवण देणे, औषधं उपचार देणे हवी असलेली प्रत्येक मदत देण्याचा प्रयत्न केला.
या कोरोना महामारीमध्ये, रात्रीचा दिवस करून जेव्हा राजू जाधव यांनी रुग्ण आणला.या कार्याची दखल घेऊन सामाजिक युवा सेवा गौरव पुरस्कारसाठी निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल राजु जाधव उपसरपंच पहुर कसबे यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.