अ.भा.फार्मसिस्ट असोसिएशच्या महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग सल्लागार पदी डॉ.संजयकुमार बारी तर प्रवक्ता पदी प्रा.मृगेंद्र पोतदार यांची निवड

215

शेंदुर्णी ता.जामनेर ,प्रतिनिधी। अखिल भारतीय फार्मसिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य नाशिक विभागाच्या सल्लागार पदी शेंदुर्णीचे सुपुत्र व एच.आर.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर चे प्राचार्य डॉ.संजयकुमार बारी यांची तर प्रवक्ता पदासाठी एस.व्ही.के.एम,धुळे चे प्रा.मृगेंद्र पोतदार यांची निवड करण्यात आली आहे. . ही निवड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.दत्ता खराटे,उपाध्यक्ष डॉ.पंकज चौधरी,प्रदेश सचिव रोहित वाघ,नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा.सुशिल पाटील यांच्या शिफारशीनुसार व सर्व पदाधिकारी यांच्या सर्वानुमते करण्यात आली आहे.
अ.भा.फार्मसिस्ट असोसिएशन ही संघाटना भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त संघटना असून सर्व तळा-गाळातील फार्मसिस्ट बंधू आणि भगिनींचे विविध प्रश्न आणि समस्या सोडवायचे कार्य ही संघटना करत असते.आतापर्यंत संघटनेच्या संघटनात्मक कार्यातून फार्मासिस्ट ला कोरोना योद्धा घोषित करण्याबाबत,ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेतील अनुभवाच्या अटी शर्ती रद्द करण्याबाबत किव्हा परीक्षा स्थगितीबाबत,आणि महाराष्टातील बोगस डॉक्टर यांच्यावर कारवाईकरिता विविध आंदोलन व निवेदन सादर करून संघटना विविध प्रश्नांवर लढा देत आली आहे आणि पुढे देखील लढा देणार आहे
डॉ.संजयकुमार बारी व प्रा.मृगेंद्र पोतदार यांच्या या निवडीबद्दल संघटनेच्या वतीने विभागीय अध्यक्ष प्रा.सुशिल पाटील,विभागीय उपाध्यक्ष मा.भैया पाटील व विभागीय सचिव प्रा.सतिष पाटील विभागीय कार्याध्यक्ष प्रा.चेतन सोनवणे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.