शेदुर्णी- गरुड महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

136

शेदुर्णी –

दि. २६ शेदुर्णी- येथील अ. र. भा. गरुड महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मान्यवर , शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला . याप्रसंगी स्तंभ पूजन कोरोना योद्धा,प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी, परिचारिका राजश्री ताई पाटील व त्यांचे पती श्री तुळशीराम पाटील आदर्श शेतकरी यांच्या हस्ते तर ध्वजारोहण धी शेंदुर्णी सेकं.एज्यू. सोसायटी चे जेष्ठ संचालक श्री सागरमलजी जैन यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी चेअरमन श्री संजय गरुड , सुधाकर अण्णा बारी , सौ.सरोजिनी ताई गरुड (जिल्हा परिषद सदस्य जळगाव),धीरज जैन , कैलास भाऊ देशमुख , प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील , शेख फारुख व सुनील गरुड तसेच शिक्षक , शिक्षकेतर बंधू-भगिनी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन क्रीडा संचालक डॉ. महेश पाटील यांनी केले.