गरुड महाविद्यालयात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालय विकास समितीची स्थापना

428

शेंदुर्णी:  शेंदुर्णी येथील अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, करिता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी ११, २०१७/पौष २१, शके १९३८, मुद्दा क्रमांक ९७ (१) नुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२०२७ करिता नवीन महाविद्यालय विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे.

महाविद्यालयातील अस्तित्वात असलेल्या महाविद्यालय विकास समितीची मुदत ३१ मार्च, २०२२ रोजी समाप्त होत असून, त्या अनुषंगाने महाविद्यालयात महाविद्यालय संस्था व्यवस्थापन, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, इ. क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिंसह महाविद्यालयातील प्राचार्य, विभागप्रमुख, आयक्यूएसी समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी, इत्यादी घटकांचे प्रतिनिधींचा समावेश असलेली नवीन महाविद्यालय विकास समिती शैक्षणिक वर्ष २०२२-२०२७ करिता व्यवस्थापनाचे अध्यक्ष किंवा त्यांची नामनिर्देशित व्यक्ती-पदसिद्ध अध्यक्ष म्हणून धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे चेअरमन श्री. संजय भास्करराव गरुड यांचे नामनिर्देशन तर व्यवस्थापनाचे सचिव किंवा त्यांची नामनिर्देशित व्यक्ती म्हणून धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे सचिव श्री. सतीश चंद्र काशीद यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे, यासह प्राचार्य नामनिर्देशित विभागप्रमुख म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. श्याम जीवन साळुंखे, अध्यापकांनी निवडून दिलेले अध्यापक अंतर्गत डॉ. रोहिदास धोंडीबा गवारे, डॉ. वसंत नानाराव पतंगे व महिला अध्यापक म्हणून डॉ. सुजाता चंद्रकांत पाटील, नियमित अध्यापकेतर कर्मचारी म्हणून महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. सतीश केशव बाविस्कर, शिक्षण क्षेत्रातील नामनिर्देशित व्यक्ती म्हणून पाचोरा व शेंदुर्णी येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर सुनीलराव गरुड, उद्योग क्षेत्रातील नामनिर्देशित व्यक्ती म्हणून शेंदुर्णी येथी कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे प्रगतीशील शेतकरी श्री. निनाद किरण सूर्यवंशी, सामाजिक क्षेत्रातील नामनिर्देशित व्यक्ती म्हणून शेंदुर्णी आणि पंचक्रोशीत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रख्यात असलेले श्री. उत्तमराव राघो थोरात, माजी विद्यार्थ्यांमधून नामनिर्देशित व्यक्ती म्हणून महाविद्यालयाचे प्रथम बॅचचे विद्यार्थी व भुसावळ येथील पी. के. कोटेचा महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. दिलीकुमार एम. ललवाणी, समन्वयक, महाविद्यालय गुणवत्ता हमी समिती म्हणून इंग्रजी विभागाचे अध्यापक आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. दिनेश प्रकाश पाटील, यांचे नामनिर्देशन करण्यात आले तर महाविद्यालयाचे प्राचार्य – सदस्य सचिव म्हणून प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील यांची महाविद्यालय विकास समिती सदस्य सचिव पदी नामनिर्देशन करण्यात आले आहे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे सभापती आणि महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे सचिव यांचे नामनिर्देशन, महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे गठन महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ निर्देशानुसार झालेले नसल्यामुळे तात्पुरते रिक्त ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ नुसार सदर समिती शैक्षणिक, प्रशासकीय आणि पायाभूत सुविधाविषयक वाढ यासंदर्भात महाविद्यालयाचा सर्वांगीण व सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करील आणि अभ्यासविषयक, अभ्यासानुवर्ती, पाठ्येतर कार्यक्रम यामधील अत्युच्च गुणवत्ता साध्य करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयास मदत करेल यासह अध्यापन व संशोधनाला चालना व बळकटी देण्यासाठी व्यवस्थापनाला शिफारस करेल तसेच वित्तीय परीपात्रकांना मान्यता, गुणवत्ता वाढ, विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्यपूर्ण व रोजगाराभिमुख उपक्रम इ. शिफारशी उच्च व्यवस्थापनाला करण्याच्या अनुषंगाने धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीच्या ठरावानुसार सदर महाविद्यालय विकास समितीची निर्मिती करण्यात आली आहे.

सदर महाविद्यालय विकास समितीच्या नवनियुक्त सदस्यांचे स्वागत धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे चेअरमन श्री. दादासाहेब संजय भास्करराव गरुड, सचिव श्री दाजीसाहेब सतीश चंद्र काशिद, सहसचिव श्री भाऊसाहेब दिपकजी गरुड, महिला संचालिका सौ. उज्वलाताई काशिद व संस्था पदाधिकारी यांनी केले आहे.