गौरव दातृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा मेणगाव शाळेस विद्यार्थी विकास मंच कडून भरीव मदत

773

वार्ताहर मेणगाव ता. जामनेर –
जि.प.मराठी शाळा मेणगाव शाळेस माजी विद्यार्थी विकास मंच( इंजिनिअर सौ.रूपालीताई बालाजी पाटील-5100 रूपये व श्री.नानासो.सुरेश नारायण पाटील -1100रूपये )यांच्याकडून भरीव अशी मदत मिळाली…त्यानिमित्त दात्यांचे आभार कार्यक्रम घेण्यात आला…कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नानासो.सुरेश नारायण पाटील हे होते…प्रमुख पाहुणे म्हणून मेणगाव शाळेच्या माजी विद्यार्थीनी सौ.रूपाली बालाजी पाटील अमेरिका स्थित ,सरपंच श्री.शरीफभाऊ तडवी,उपसरपंच श्री. पी.गणेश(सिंगर) दादा,ग्रा.पं.सदस्य श्री.विलास भाऊ पाटील,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री.सुनिल मेढे,गावाचे पोस्टमास्तर श्री.सुधाकर दादा चौधरी,आधार कॅम्पसाठी आलेले श्री.राधेश्याम सैत्वाल सर,श्री.गायके सर,श्री.प्रमोद अवस्ती(डाकविभाग कर्मचारी),श्री.हरिभाऊ महाजन,श्री.गोपाल एकनाथ पाटील,श्री.शेखर कोळी,श्री.किरण धुमाळ,सौ.लताबाई गायकवाड,श्री.सुनिल पाटील उपस्थित होते….याप्रसंगी सौ.रूपालीताई व श्री.नानासो.सुरेश पाटील यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यातआला.. सौ.रूपालीताई यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज. केले….श्री.पी.गणेश दादांनी गाणे गायीले….हरिभाऊ महाजन यांनी मनोगत व्यक्त केले..कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व शेंदुर्णी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.निवृत्ती जोहरे सर,श्री.सुनिल पाटील सर,श्री.अस्वार सर यांनी प्रयत्न केले….सूत्रसंचालन श्री.प्रशांत जोशी सर व आभार प्रदर्शन श्री.गोपाल कुमावत सर यांनी केले.