रामेश्वर तांडा येथे स्वातंत्र दिन साजरा.

247

 

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी )15 ऑगस्ट 2022 या निमित्ताने ह्या वर्षी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाली म्हणून संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( platinum jubilee )साजरा होत आहे. हा एक आनंदाचा क्षण तसेच अभिमानाचा दिवस होय. दि.15 ऑगस्ट रोजी रामेश्वर ,ता.पाचोरा येथे सर्वानुमते ग्रामस्थ यांनी ध्वजारोहण करण्याचे मान आपल्या गावातील तसेच परिसरात 12 वि विज्ञान शाखेतून प्रथम आलेली विध्याथीनी कुमारी वनिता भिमराव पवार व शैक्षणिक उपक्रमात हिरारीने भाग घेणारी कुमारी आश्विनी राजू राठोड यांच्या हातून ध्वजारोहण करण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविका पार्वता मांगीलाल राठोड व आशा वर्कर अनिता ईश्वर राठोड सेविकांच्या हस्ते ध्वज पुजन करण्यात आले.*
या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य जेष्ठ नागरिक, विध्यार्थी, महिला उपस्थित होते.