रोटवद येथील माजी पोलीस पाटील व ग्रा.पं. सदस्य.कै.लक्ष्मण भिका पाटील यांचे दुःखद निधन.

231

 

लोहारा (प्रतिनिधी ) लोहारा येथून जवळच असलेल्या रोटवद ता.जामनेर येथील माजी पोलीस पाटील व ग्रा.पं. सदस्य.कै.लक्ष्मण भिका पाटील वय (70) यांचे दि.6 रोजी रात्री उपचारा दरम्यान जळगांव येथे खाजगी दवाखान्यात दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्यावर आज दि.7 रोजी रोटवद येथे 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांनी रोटवद गावचे पोलीस पाटील म्हणून अंदाजे 35 वर्ष सेवा केली आहे. त्यांच्या पच्यात पत्नी,2 मुलं,1 मुलगी,3 भाऊ, जावई, नातवंड असा परिवार आहे. ते रोटवद येथील सामाजिक कार्यकर्ते भानुदास भिका पाटील,वाल्मिक भिका पाटील, विनायक भिका पाटील यांचे जेष्ठ बंधू होत.