रथोत्सवासाठी शेंदुर्णीत जयत तयारी. विविध आघाड्यांवर तयारी अंतिम टप्प्यात.

632

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी  –  सोमवारी शेंदुर्णी चा 278 वा रथोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा होत आहे .कडुबा महाराज संस्थानचे आठवे गादी वारस ह भ प शांताराम महाराज भगत तसेच तुषार भगत, डॉ योगिता चौधरी यांच्या नियोजनाखाली संस्थांनमध्ये रथ उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
त्यात चोपदार विजय जगन्नाथ सोनार ,गजानन एकनाथ सुतार, भालदार प्रल्हाद बाळू गवळी, दीपक सुरेश चौधरी, वामन सकट उठा वाले प्रल्हाद भगत, देवराम चौधरी, शंकर चौधरी, शरद महाले, रथावरील मंडळी निंबाजी भगत, ईश्वर भगत ,कानगी वाले तुषार भगत, राजू पवार व इतर भाविक भक्त नागरिक परिश्रम घेत आहे.
रथ सजावटीला लागणाऱ्या फुला करता माधव बाबा भक्त मंडळाचे सदस्य माळा बनवण्याचे काम गजानन गरुड पतसंस्थेच्या सभागृहात करीत आहे. त्यात विठ्ठल महाराज ,संजय जंगले, रामकृष्ण ढगे, आनंदा राऊत ,अर्जुन डोंगरे, विठ्ठल महाराज ,सोपान वाडे, माजी सैनिक प्रकाश गुजर, गजानन बारी, नितीन बारी, विशाल बारी, रतन बारी ,ईश्वर बारी व इतर मंडळी आपला सहभाग नोंदवित आहे.
उत्तमराव थोरात यांनी रथोत्सवाच्या दिवशी भाविकांच्या सोयीसाठी शेंदुर्णीतील नागरिकांनी कोणीही मोटार सायकल वापरू नये असे आवाहन केले आहे .
तसेच पोलिसांनी गावाबाहेरच वाहने उभी करावी असे आवाहन आजूबाजूच्या गावातील आलेल्या नागरिकांना केलेले आहे गावात वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.