शेंदुर्णीत ऋतुजा लटके यांच्या विजयाचा जल्लोष.

115

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ऋतुजा रमेश लटके ह्या प्रचंड मत धिक्याने विजयी झाल्याने शेंदुर्णीत शिवसेनेच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
शिवसेना शहर प्रमुख संजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली वाचनालय चौक, पहूर दरवाजा व बस स्टॅन्ड भागात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली .जय भवानी जय शिवाजी च्या घोषणेने परिसर दणाणून गेला. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके व आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी बोलताना शहर प्रमुख संजय सूर्यवंशी यांनी सांगितले की शिवसेना मशाल चिन्हाने सतत पुढे जात राहील. चिन्ह कोणतेही असले तरी जनता आमच्या सोबत असल्याचे यावेळी दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय सूर्यवंशी ,युवा सेना अधिकारी अजय भोई, भूषण बडगुजर, संदीप बारी, बारकू जाधव, विलास बारी, अशोक बारी ,सुनील फुलचंद अग्रवाल, युवराज बारी, तुकाराम पाटील ,कैलास काबरा ,राजू पाटील ,भूषण बडगुजर ,रमेश भोसले, सुनील बारी व इतर असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.