पाचोरा जामनेर चार पदरी रस्त्याचे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन

121

शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी  – शेंदुर्णी वरून जाणारा पाचोरा जामनेर रोडवर दोन किलोमीटर रस्ता हा चार पदरी होत आहे त्याची भूमिपूजन नगराध्यक्ष विजया खलसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले
याबाबत सविस्तर वृत्त असे की गोपाला निघा सिटी पासून गरुड विद्यालयापर्यंत चार पदरी रस्ता त्यामध्ये डिव्हायडर असा मंजूर झालेला आहे त्यातील पहिल्या टप्प्याचे काम गोपाला मेगा सिटी पासून मम्मा देवी मंदिरापर्यंत कामाची सुरुवात झालेली आहे सदर रस्ता हा 50 ते 55 फूट रुंद राहणार असून त्यात मध्यभागी डिव्हाइडर होणार आहे त्यात स्ट्रीट लाईट बसवण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असून लवकरच तेही मंजुरी मिळेल असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी सांगितले त्या कामाचे भूमिपूजन शेंदुर्णी नगरपंचायत नगराध्यक्ष विजया खडसे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी शेंदुर्णी नगरीच्या नगराध्यक्ष विजया खलसे भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल भाजपा नेते अमृत खलसे सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर चे अधिकारी आर डी पाटील डी टी शनिवार डी एस चौधरीतसेच ठेकेदार भोजराज पुंशी व इतर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते
सदर रस्त्यावर मंदिर शाळा महाविद्यालय असल्याने वाहतुकीचा विद्यार्थ्यांना मोठा सामना करावा लागत होता परंतु एकतर्फी वाहतूक व रस्ता रुंदीकरणामुळे विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे.