शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचा 79 वा वर्धापनदिन दिमाखात साजरा होणार 

463

 

शेंदुर्णी: धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचा 79 वा वर्धापन दिन आणि संस्थेचे संस्थापक, सहकार महर्षी कै. अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांचा अर्धकृती पुतळ्याचे अनावरण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे प्रथम कुलगुरू प्रा. डॉ. एन. के. ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत 17 जुलै 2023 रोजी संपन्न होत आहे.

धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदुर्णी हि  संस्था स्वातंत्र्यपूर्व काळात 17 जुलै, 1944 रोजी स्थापन होऊन आज अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करून आपल्या यशस्वी वाटचालीने  17 जुलै, 2023 रोजी 79 वर्ष पूर्ण करीत आहे, ह्या संस्थेच्या माध्यमातून शेंदुर्णी पंचक्रोशीसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ग्रामीण, वस्ती, तांड्यावरील गरीब, कष्टकरी, अल्प उत्पन्न गटातील, आर्थिक दुर्बल घटकातील  आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच अन्नदानाचेही कार्य करून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविण्याचे कार्य अविरत करीत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सहकार महर्षी कै. अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांनी संस्थारुपी वटवृक्ष स्थापन करून पुढे कै. आचार्य  बापूसाहेब गजाननराव रघुनाथराव गरुड (उपसभापती, विधानसभा, महाराष्ट्र राज्य) यांनी या वटवृक्षाचे जाळे जिल्हाभर वाढविण्याचे कार्य अविरत केले, आजमितीस यासंस्थेचे 01 वरिष्ठ महाविद्यालय, 03कनिष्ठ महाविद्यालये, 15 माध्यमिक विद्यालये, 15 वसतिगृह, 01प्राथमिक शाळा, 01 बालक मंदिर, १ कर्मचारी पतसंस्था, इ. अस्थापनाद्वारे ज्ञानदानाचे कार्य संस्थेचे चेअरमन श्री संजय भास्करराव गरुड, सचिव श्री सतीश चंद्र काशीद आणि सर्व संस्था पदाधिकारी  यांच्या मार्गदर्शनाने सुरु असून आज हा  शिक्षणरूपी  वटवृक्ष बहरत यशस्वी वाटचाल करीत आहे अशा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ग्रामीण, वस्ती, तांड्यावरील गरीब, कष्टकरी, अल्प उत्पन्न गटातील, आर्थिक दुर्बल घटकातील  आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ज्ञानगंगा असलेल्या आमच्या धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्ताने ज्यांनी हि संस्था प्रत्यक्षात आणली आणि  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गौरविलेले संस्थेचे अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, ज्यांच्या नावाने ओळखले जाते  असे आमच्या संस्थेचे शिल्पकार, सहकार महर्षी कै. अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांच्या अर्धाकृती पुतळ्याचेही  अनावरण सोहळा  धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि. शेंदुर्णी आणि आचार्य बापुसाहेब गजाननराव गरुड फाउंडेशन, शेंदुर्णी व्दारा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे.
संस्थेचा 79 वा वर्धापन दिन सोहळा आणि संस्थेचे संस्थापक, सहकार महर्षी कै. अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा, अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी व्दारा आयोजित केलेला आहे.  याअनुषंगाने  दिनांक :-16 जुलै 2023 रविवारी  संस्थांतर्गत शाळांचे विज्ञान व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्याकरिता उद्घाटक म्हणून राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळ्याचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांवचे अधिसभा सदस्य  मा. प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील हे असतील. तर दि. 17 जुलै 2023 सोमवार रोजी सकाळी संस्थेचे संस्थापक, सहकार महर्षी कै. अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण प्रमुख अतिथी मा. डॉ. निंबा कृष्णा ठाकरे प्रथम कुलगुरु, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांच्या शुभहस्ते केले जाणार असून संस्था वर्धापन दिन सोहळ्याचे ते प्रमुख अतिथी देखील आहेत, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ऑप. सोसायटी लि. शेंदुर्णीचे चेअरमन मा. श्री. दादासाहेब संजयरावजी गरुड, हे असतील आणि विशेष अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री सतिश चंद्र काशीद यांची उपस्थिती लाभणार आहे, यासह श्री. दिपक काशिनाथराव गरुड (सहसचिव)  सौ. उज्वलाताई सतीश काशिद (संचालक) श्री. सागरमलजी जैन (संचालक)  श्री.भिमराव शामराव शेळके (संचालक) श्री. उत्तमसिंग उमेदसिंग पाटील (संचालक) श्री. किशोर मानसिंग पाटील (संचालक) श्री. अभिजित सतीश काशिद (संचालक)  कु. देवश्रीताई सतीश काशिद (संचालिका) श्री. कैलास देशमुख (वसतिगृह सचिव), श्री.संजय पी. उदार (कर्मचारी प्रतिनिधी) इ. संस्था पदाधिकारी उपस्थित असतील या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य  प्रा. श्याम जीवन साळुंखे (प्रभारी प्राचार्य) तसेच श्री.सतीश केशव बावीस्कर (चेअरमन-शेंदुर्णी एज्यु. सोसा. कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी शेंदुर्णी), उपप्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत.  तसेच या सोहळ्यासाठी शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने वर्धापन दिनाच्या निमित्ताने खुप खुप  शुभेच्छा.