कुऱ्हाड येथील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करीता तहसीलदार व कृषी विभागास निवेदन

335

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील लोहारा येथून जवळच असलेल्या कुऱ्हाड येथील शेतकऱ्यांनी कुऱ्हाड गावातील विजय कृषी केंद्र येथून सरदार ऍग्रो फर्टीलायझर अँड केमिकल्स या कंपनीचे मटेरीयल खत सुपर फॉस्फेट पावडर दाणेदार कपाशी पिकाला दिल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सदर नुकसान बाबत पंचनामे होऊन शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी याकरिता पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्यासह कृषी विभागास निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे आम्ही विजय कृषी केंद्र कुऱ्हाड खुर्द येथून सरदार ऍग्रो फर्टीलायझर अँड केमिकल्स या कंपनीचे सुपर फॉस्फेट पावडर नावाचे खत सदर दुकानावरून खरेदी केले होते तेच खत आम्ही आमच्या शेतात कापूस पिकास दिलेले असता काही दिवसानंतर सदर कापूस पिकाचे शेंडे फांद्या जमा झालेल्या दिसले त्यामुळे सदर खताचा कापूस या पिकावर वाईट परिणाम होऊन संपूर्ण कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर पीक काढून टाकण्यासाठी पर्याय उरला नाही तरी आपण सदर पिकाची पाहणी व तात्काळ पंचनामा करावा व झालेला नुकसानी बद्दल भरपाई मिळावी या अशा आशयाचे निवेदन तहसीलदार प्रविण चव्हाणके व कृषी विभागाचे तालुका अधिकारी रमेश जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी एस एस भालेराव,यांना निवेदन देण्यात आले.