जैन मुनिच्या हत्तेचा शेंदुर्णी येथे सकल जैन समाजाचा जाहीर निषेध मोर्चा द्वारे आरोपीस कडक शासन करण्यासाठी मागणी संपूर्ण जैन समाजात तीव्र आक्रोश

314

शेंदूर्णी ता. जामनेर – जैन मुनि आचार्य कामकुमारनंदीजी महाराज यांची राज्यातील हिरेकुडी आश्रम जिल्हा- बेळगाव येथे मौन साधनेत असतांना त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण जैन समाजात तिव्र आक्रोश असून या निंदनिय घटनेचा अखील भारतीय जैन संघटना व शेंदूर्णी येथील संपूर्ण जैन समाज तिव्र शब्दात जाहीर निषेध करीत आहे. या साठी येथील सकल जैन समाजाने दि. २० जुलै रोजी सकाळी १० वाजता मोर्चा काढुन निषेध व्यक्त केला व आरोपीस कडक शासन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करून महाराष्ट्र शासनाकडे निवेदन सादर केले. सदर निवेदन तहसीलदार जामनेर यांचेकडे सर्कल ऑफीसर महादेव फड , तलाठी एस. एम. नाईक व पी.एस. आय दिलीप पाटील साहेब यांना व महाराष्ट्र शासन, तसेच माननीय पंतप्रधान दिल्ली माननीय महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांचेकडे सादर केले. सदर अधिकाऱ्यांनी सदर निवेदन त्वरीत पाठविले जाईल असे सांगून निवेदन स्विकारले. या वेळी सकल जैन समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थीत होते. निवेदनावर सकल जैन समाजाच्या पुरुष व महिला यांनी स्वाक्षरी केली यावेळी सुमारे तीनशे पुरुष व महिलांनी उपस्थीत राहुन मोर्चात “आरोपीस कडक शासन झालेच पाहिजे ” अशा घोषणा दिल्या.