अंगावर विज कोसळून दोन तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू

295

 

भडगाव प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील कासोदा आडगाव येथे आज सायंकाळी विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला अडगाव – अंजनविहीरे रस्त्यावर असलेल्या टोळी शिवारात शेती काम करीत असलेले दोन तरूण शेतकऱ्यांचा अंगावर विज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली. रविंद्र प्रभाकर महाजन व महेंद्र उखर्डु पाटील अशी मयतांची नावे आहेत पहिल्या नवरात्रीच्या माळ्याला ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.आडगांव परिसरातील शेतीशिवारात रविंद्र प्रभाकर महाजन वय २३ व महेंद्र उखर्डु पाटील वय २६ रा. आडगाव हे अडगाव – अंजनविहीरे रस्त्यावर असलेल्या टोळी शिवारात आपल्या स्वतःच्या शेतात शेती काम करीत अचानक आलेल्या पावसामुळे विजांचा कडकडाट झाला. यावेळी रविंद्र महाजन व महेंद्र पाटील यांच्या अंगावर विज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील शेतकऱ्यांचा ही घटना लक्षात येताच त्यांनी आडगाव पोलिस पाटील यांना माहिती दिली. या प्रकरणी आडगाव पोलीस पाटील नितीन भावसारे यांनी पोलिसांना माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या दोघा तरूण शेतकऱ्यांचा मृतदेह कासोदा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छदनासाठी नेण्यात आला. शेतकऱ्यांचे मृतदेह पाहुन कुटूंबियांनी एकच हंबरडा फोडला. या प्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत पाटील व शरद पाटील हे करीत आहेत.