भाजपा सरकार च्या शेतकरी काळा कायदा विरोधात एरंडोल ला कॉग्रेस चा एल्गार

261

 

एरंडोल प्रतिनिधी  – भाजपा प्रणित मोदी सरकार ने हिटलरशाहीत शेतकरी विरोधात काळा कायदा निर्माण केला असून या विरोधात देशात कॉग्रेस आक्रमक झाली असल्याने एरंडोल येथे सह्यांची मोहीम सुरू केली आहे शेतकरी विरोधात भाजपचे मोदी सरकार ने मोहीम उघडली असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार देशात सुरू आहे शेतकऱ्यां तोट्यात आणणारा काळा कायदा संसदेत पास करुन हिटलरशाहीचे सरकार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे कॉग्रेस ने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात आंदोलन सुरू केले आहे. यात हा कायदा तात्काळ रद्द व्हावा म्हणून राष्ट्रपतींच्या नावाने शेतकऱ्यांची सह्या करण्याची मोहीम सुरू करण्यात आले आहे याचा एक भाग म्हणून एरंडोल कॉग्रेस ने तालुका निरीक्षक सचिन सोमवंशी, तालुका अध्यक्ष विजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम सुरू केली. येथील पंचायत समितीच्या समोर ही मोहीम राबविण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष संजय महाजन, उपाध्यक्ष प्रा. आर. एस. पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष इब्राहिम सैयद, सेवा दल अध्यक्ष संजय कलाल माजी शहराध्यक्ष आंनद सदांनशिव, कासोदा शहराध्यक्ष सुरेश पवार, लिगल सेल अध्यक्ष अॅड. हिंमत पाटील, शेतकरी संघ संचालक प्रकाश ठाकुर सुदर्शन महाजन आंदीनी परीश्रम घेतले तर या उपक्रमात सेनेचे तालुका अध्यक्ष वासुदेव पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, माजी न. पा. उपाध्यक्ष किशोर निंबाळकर, नगरसेवक डॉ. सुरेश पाटील, राजेंद्र शिंदे, शालीक गायकवाड, कासोदा सेना अध्यक्ष रवींद्र चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, डॉ. राजेंद्र चौधरी, शेख सांडु, किशोर पाटील आदींनी भेट दिली. बहुसंख्य शेतकऱ्यांनी सह्यांच्या मोहीमेत सहभाग नोंदवला. ही मोहीम दि. ३१ अॉक्टोंबर पर्यन्त सुरुच राहणार आहे.