शेंदुर्णीतील पारळकर दांपत्याची मोटार सायकलने नर्मदा परिक्रमा

233

शेंदुर्णी ता.जामनेर… 
हिंदु धर्मात पवित्र मानली जाणारी ,थोडी अवघड असणारी नर्मदा परिक्रमा येथील दिनेश गोविंदराव पारळकर व सौ.शैलजा दिनेश पारळकर या दांपत्याने मोटार सायकलने सुरू केली आहे.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहुर्तावर भल्या पहाटे या दांपत्याने मोटार सायकलने नर्मदा परिक्रमा करण्यासाठी शेंदुर्णी हुन कुच केली.
जवळपास ४००० किलोमीटर चा ही परिक्रमा असुन अंदाजे १६ दिवस यासाठी लागणार आहे. शहरातील असंख्य भाविकांनी यापुर्वी नर्मदा परिक्रमा पुर्ण केली.आहे.पायी,बस द्वारे पुर्ण केलेली असुन प्रथमच पुर्ण नर्मदा परिक्रमा मोटारसायकल वर जाणारे हे पहिलेच दांपत्य आहे.
या नर्मदा परिक्रमेत शेंदुर्णीहुन ओंकारेश्वर, रावेरखेडी,तेली भट्याण,राज पिपला,भालोद,पोईचा,अंकलेश्वर,समुद्र मार्गे भरुच,नारेशँवर,कुबेर भंडारी, गरुडेश्वर,मांडुगड,महेश्वर,नेमावर,भेडाघाट,अमरकंटक,नरसिंगपुर,होशंगाबाद व पुउ ओंकारेश्वर असा मार्ग आहे.
यासोबतच ह.भ.प.रघुनाथ महाराज बारी यांच्या समवेत काही भाविक बसद्वारे नर्मदा परिक्रमा करत आहे.