गल्ले बोरगाव येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद; 200 नागरिकांचे लसीकरण

252

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांची गल्ले बोरगाव येथील लसीकरण शिबिराला भेट. लसीकरणासाठी नागरिकांचां उस्फुर्त प्रतिसाद पाहून समाधान .

गल्लेबोरगाव येथे एकाच दिवसात 200 नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण ; शिबिर दोन दिवस चालणार नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन.

खुलताबाद / प्रतिनिधी
तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे जिल्हा अधिकारी औरंगाबाद तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, गटशिक्षणाधिकारी सचिन साळुंके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे यांच्या अधिपत्याखाली शुक्रवारी कोरोना (covid-19) प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले. शिबिराला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत लसीकरण करून घेण्यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन करीत मोठी गर्दी केली होती. शिबिरादरम्यान 200 नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
या वेळी दुपारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी भेट देऊन लसीकरणाचा आढावा घेतला व नागरिक स्वयमस्पूर्तीने लसीकरण करून घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

शुक्रवार दि. 2 रोजी जिल्हा परिषद औरंगाबाद, पंचायत समिती खुलताबाद, तहसील कार्यालय खुलताबाद, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत गल्ले बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गल्ले बोरगाव येथे वय 45 वर्षां पासून पुढील सर्व नागरिकांसाठी कोरोना (covid-19) प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली,
लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी 10 वाजता सरपंच विशाल खोसरे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला या वेळी जिप माजी सभपती भिमराव खंडागळे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, गटशिक्षणाधिकारी सचिन साळुंके, डॉ.बी.आर.पांडवे, विस्तार अधिकारी एच.बी.कहाटे, शशिकांत ससाणे,नायबतहासिलदार गवळी, मंडळ अधिकारी विलास सोनवणे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, पोलीस पाटील सिंधुताई बढे, तलाठी कुलकर्णी, गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना लसीकरण करून घेण्याविषयी सरपंच विशाल खोसरे ,पोलीस पाटील सिंधुताई बढे यांच्या आव्हानाला गल्ले बोरगावसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळी 10 वाजेपासूनच कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मोठी गर्दी केली होती.
या वेळी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 200 नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती वेरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बलराज पाडवे यांनी दिली.
तात्काळ ऑनलाइन नोंदणी व लगेच लसीकरण सुविधा गावातच उपलब्ध झाल्याने वयोवृद्ध, आजारी जे की बाहेर गावी लसीकरणासाठी जाऊ शकत नाही आशा नागरिकांची मोठी सोय झाली होती.

दरम्यान दुपारी 2 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी गल्ले बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सुरू असलेल्या लसीकरण केंद्र ला भेट दिली व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधून लसीकरण किती महत्वाचे आहे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच लसीकरणाविषयी व्यापक जनजागृती करून 45 वर्षापुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे ,तसेच ज्या गावचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण 100 टक्के होईल आशा ग्रामपंचायतींचा पंचायत समितीच्या वतीने सत्कार करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या. गल्ले बोरगाव येथील नागरिकांचा लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी गल्ले बोरगाव ग्रामपंचायत च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांच्या सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणारे वेरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज पांडवे यांचा या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी विशेष सत्कार केला.

शासनाने 1 एप्रिल पासून 45 वर्ष पुढील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्या अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बलराज पाडवे यांच्या अधिपत्याखाली या लसीकरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, पोलीस पाटील सिंधुताई बढे, चेअरमन तथा ग्रा.प. सदस्य तुकाराम हारदे, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र बढे, अशोक खोसरे, संतोष राजपुत, व्हाईस चेअरमन दिलीप बेडवाल, उपतालुका प्रमुख दीपक खोसरे, शेषराव अण्णा भागवत,संदीप सिरसाठ,शंकर दुधारे, प्रकाश सेवांरे,भिमसिंग राजपुत, लक्ष्मण अमृत्ते, यांनी पुढाकार घेतला होता.
तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बलराज पांडवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत तुपे, डॉ. ज्योती कांबळे, डॉ. प्रसाद देशपांडे, ग्रामसेवक आर.एन लांडगे, कानबा झाटे, सुधाकर बोडखे, एस.पी. वाघ, साठी रविराज खंडागळे, राधा ठेंगडे, छाया तुपे, योगेश जोशी, शिवाजी बोलाधने, संदीप जाधव, आर. जी. वाघमारे पी. डी. शेरे, श्रीमती साबळे, आशा कार्यकर्ती सविता लेकुरवाळे, मीना फुलारे, ज्योती साळुंके, ज्ञानेश्वर शिरसाट, गणेश खोसरे, लक्ष्मण अमृते आदींनी लसीकरण शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.