रासेयो च्या स्वयंसेवकांनी जात-पात धर्मनिरपेक्ष रचना उभारणीसाठी पुढाकार घ्यावा- प्रा. डॉ. प्रभाकर देसाई

265

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर …
अप्पासाहेब र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो एककाच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या आभासी पोस्टर, व्हिडिओ व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय सेवा योजना सेल चे राज्य संपर्क प्रमुख प्रा.डॉ.प्रभाकर देसाई यांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श महाविद्यालय,निजामपूर येथील प्राचार्य व कबचौ उमवि जळगाव अधिसभा सदस्य मा.प्रा.डॉ.अशोक खैरनार हे होते.तसेच कबचौ उमवि जळगाव चे रासेयो संचालक प्रा. डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांची सुद्धा उपस्थिती लाभली.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.श्याम साळुंखे यांनी केले.त्यांनी प्रस्ताविकात महाविद्यालयाचा व रासेयो एककाच्या प्रगतीचा आढावा मांडून कोरोना महामारीच्या काळात राबविलेल्या समाजपयोगी उपक्रमांची मांडणी केली.
यानंतर प्रमुख अतिथी प्रा.डॉ.प्रभाकर देसाई यांनी आपल्या मार्गदर्शनात उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी रासेयो स्वयंसेवकांनी जात,पात धर्म निरपेक्ष रचना उभारणीसाठी प्रयत्न करून पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन केले.तसेच त्यांनी महाविद्यालयातील रासेयो एकक राबवित असलेल्या समाजपयोगी उपक्रमांबद्दल कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या नंतर स्पर्धा परिक्षकांपैकी निबंध,पोस्टर व व्हिडिओ स्पर्धेतील प्रा.डॉ.संजय भोळे,प्रा.डॉ.योगेश महाले, प्रा.डॉ.निलेश माळीचकर व राजू भुईकर यांनी आपले मनोगत मांडले व सहभागी स्पर्धकांच्या लेखन,सादरीकरण व कलात्मक कौशल्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. या नंतर स्पर्धकांमधुन जयश्री गिरासे,पूनम आघाव,अश्विनी पाटील,नावेद अक्तर यांनी स्पर्धा आयोजना बद्दल आनंद व्यक्त करीत स्पर्धेतुन मिळालेल्या संधी बद्दल आभार व्यक्त केले.
कबचौ उमवि जळगाव चे रासेयो संचालक पंकजकुमार नन्नवरे यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून उपस्थित रासेयो स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.त्यांनी रासेयो एककाची मोलाची भूमिका मांडली.
या मार्गदर्शन सत्रानंतर निकाल घोषित करण्यात आले.पोस्टर स्पर्धेचा निकाल त्या स्पर्धेचे समन्वयक प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे यांनी घोषित केला निकाल पुढील प्रमाणे 1) मुस्कान विश्वकर्मा,नेरुळ (विभागून) 2) आकांक्षा त्रिपाठी,नवी मुंबई,2) योगिता गोकुळदास रायबोले,देऊळगाव राजा 3)अलिंदा रेमंड फारगोसे,मुंबई
निबंध स्पर्धेचा निकाल त्या स्पर्धेच्या समन्वयिका प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील यांनी घोषित केला निकाल पुढील प्रमाणे 1)रिया संदीप पाटील,जळगाव,(विभागून)2)भूषण सहदेव तांबे,वडाळा 2) मुस्कान विश्वकर्मा,नेरुळ 3) शिफा नजीर बागवान, जळगाव
व्हिडिओ स्पर्धेचा निकाल त्या स्पर्धेच्या समन्वयिका प्रा.डॉ.योगिता पी.चौधरी यांनी घोषित केला निकाल पुढील प्रमाणे 1)पूनम आघाव,देऊळगावराजा,(विभागून) 2)यश पंढरीनाथ जगताप,चोपडा, 2)गौरी संतोष शिवपूजे, शेंदूर्णी
3) योगिता यशवंतराव दोनाडकर, देऊळगावराजा.या प्रमाणे प्रथम 1001,द्वितीय 701 व तृतीय 301 व प्रमाणपत्र विजेत्यांना देण्यात येणार आहेत.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.अशोक खैरनार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रउभारणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोलाची भूमिका बजावत आहेत असे प्रतिपादन केले. तसेच रासेयो स्वयंसेवकांनी अनेक अडचणींना न घाबरता कोरोना काळात समाजपयोगी काम केले असे म्हटले व सर्वांचे कौतुक केले.स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक करत कोरोना काळात महाविद्यालये बंद असतांना ह्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खूप चांगले व्यासपीठ मिळाले असे म्हटले.
पोस्टर स्पर्धेत एकूण 55, व्हिडिओ स्पर्धेत 20 व निबंध स्पर्धेत 94 विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून सहभाग नोंदविला.या पुरस्कार वितरण सोहळ्यास आभासी पद्धतीने 201 जणांनी उपस्थिती दिली.सदर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र online पद्धतीने रोख रक्कम खात्यावर टाकली जाणार आहे.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.योगिता चौधरी यांनी व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी केले.