कन्यारत्न प्राप्त झाल्याने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात बिस्किट व फळे वाटप

397

 

लोहारा ( दिनेश चौधरी )

मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी माणुसकी समूह वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, यामध्ये आज माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर(लोहारा.ता. पाचोरा) यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने व चंद्रकांत गीते यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय जळगाव येथे बिस्किटे व फळे रुग्णांना वाटप करण्यात आले. लेकीच्या जन्मदर वाढावा यासाठी सुमित यांना २०१६ पासुन ज्या कुटुंबात मुलीचा जन्म होइल त्या कुटुंबातील वडिलांना २महिने २१ दिवस सलुन सेवा मोफत करतात व आईला साडि चोळी व मुलीला ड्रेस व मुलीचे जवळ देखील मोफत करतात एवढच नाही तर सु कन्या योजनेचे खाते उघडून २८१ रु पन मुलीच्या नावे टाकतात कितीतरी जन्म दात्याचया चेऱ्यावर हसु आनले आहे. समाजातील काही लोकांची मानसिकता बदलायला हवी त्या मागचा उद्देश आहे.यावेळी समाजसेवक अनील लुनिया,सुमित पंडित,शामराव पंडित,चेतन पाटील व माणुसकी रुग्णसेवा समूह सभासदांनी सहकार्य केले.