शरद सोनार यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार मोठ्या थाटामाटात प्रदान

148
                                                                       प्रतिनिधी..गजानन क्षीरसागर
सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह व शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त लोहारा तालुका पाचोरा येथील सामाजिक क्षेत्रातील कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व शरद सोनार माजी उपसभापती यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांना हा पुरस्कार मोठ्या थाटामाटात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याने पुन्हा माझी जबाबदारी वाढली असून पुन्हा मी जोमाने सामाजिक कार्यात कार्य करीत राहणार असल्याचे शरद सोनार यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सुनील क्षीरसागर,गणेश गोसावी उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व समाजांतून सर्वत्र कौतुक होत आहे.