महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला दोन वर्षाची शिक्षा

156

 

पाचोरा (प्रतिनिधी जावीद शेख) पाचाेरा तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षाचा कारावास व पाच लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान, तीन वर्षानंतर हा निकाल लागला आहे.याप्रकरणी दि. ५ डिसेंबर २०१८ रोजी कलम ३५४ (अ) नुसार पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणात चार साक्षीदार तपासले आहेत. बदरखे येथील नितीन सुभाष पाटील याने गावातील एका महिलेचा विनयभंग केल्याने या केसचा निकाल तीन वर्षांनंतर आज दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी लागला आहे. न्यायमूर्ती एफ. के. सिद्दीकी यांनी या गुन्ह्यात आरोपी नितीन पाटील यास दोन वर्षाचा कारावास व पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पाच हजार रुपये दंड न भरल्यास पुन्हा एक महिन्याचा कारावास वाढविण्यात येणार आहे.दरम्यान आरोपीतफॅ अॅड दिपक यांनी काम पाहिले, तर फिर्यादी महिलेतफॅ सरकारी वकील आर के, माने यांनी काम पाहिले प्रकरणी कोर्ट पेरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल दिपक (आबा )पाटील विकास सूर्यवंशी यांनी सहाकार्य केले.