शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटार चोर भडगाव पोलिसांच्या ताब्यात

268

जावेद शेख पाचोरा –  समाधान संतोष पाटील रा.लोन पिराचे व निबा लक्ष्मण मोहिते रा.देव्हरी । कनाशी
या दोघा शेतकऱ्यांच्या शेतातून विहिरीतील मोटार चोरीला गेली
तरी आज मोटार चोरणारे मोटार विकण्यासाठी घेऊन जात असताना त्याची गाडी लोझे ता चाळीसगाव गावात बंद पडली व त्या गावातील लोकांनी विचार पूस केल्यास चोरांनी सांगितलं की आम्ही ह्या मोटारी लोन पिराचे व देव्हरी गावातून चोरी करून आणली आहे. मोटर चोर, 1-विजय अशोक मोरे रा बोदर्डे ता भडगाव  2-किरण भिकान मोरे रा देव्हरी ता भडगाव
तरी याना आज रोजी भडगाव पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे पुढील कारवाई भडगाव पोलीस करत आहे.