नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्या: भारत मुक्ती मोर्चा

163

 

जामनेर तहसीलला निवेदन

जामनेर- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनेच्यावतीने आज रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण ३५८ तालुक्यातील तहसीलच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
या वरील विषयांच्या अनुषंगाने दिनांक २४ जून २०२१( दि.बा. पाटील स्मृतिदिन) रोजी भारत मुक्ती मोर्चा जामनेर युनिट कडून या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील शासनाचे प्रतिनिधी म्हणून मा. तहसीलदार साहेबांनामार्फत
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना भारत मुक्ती मोर्चा तालुका प्रभारी मा.निलेश हिवाळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले
यावेळी भारतीय बेरोजगार मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मा. राहुल सपकाळे,नफ चे तालुका अध्यक्ष मधुकर जोहरे, बहुजन मुक्ती पार्टी चे जामनेर तालुका अध्यक्ष भास्कर जोहरे, असंघटित कामगार अरुण जोहरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन सादर प्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे तालुका प्रभारी निलेश हिवाळे आपली यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की दिवंगत लोकनेतेदि.बा. पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रातील मूलनिवासी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी निस्वार्थपणे तहायत लढणारे नेते होते. त्यांच्या प्रयत्नाने आणि आंदोलनाने नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी बांधवांना न्याय व जमिनीचा हक्क मिळाला. त्याच जमिनी सरकार आज सिडकोने नवी मुंबई विमानतळासाठी पुन्हा मूलनिवासी भूमिपुत्र कडून काढून घेतल्या. अशा जमिनीवर होऊ घातलेल्या विमानतळाला दिवंगत लोकनेतेदि.बा. पाटील साहेबांचे नाव देऊन लोक नेत्यांचा नव्हे तर, विमानतळाचाच गौरव होईल. अशी आमच्या मूलनिवासी भूमिपुत्रांची भावना आहे.
सदर भारतातील आमचा सर्व मूलनिवासी बांधवांच्या भावनेचा गांभीर्यपूर्वक विचार करून नवी मुंबई येथील विमानतळाला “दिवंगत लोकनेतेदि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” हेच नाव द्यावे. व मूलनिवासी बांधवांच्या भावनांशी खेळ न करता माननीय मुख्यमंत्री साहेब आपण तातडीने कार्यवाही करून निर्णय घ्यावा.