“आचार्य विद्या विकास पॅनल” चा शेंदुर्णी येथील काशीविश्वेश्वर मंदिर येथे नारळ फोडून प्रचार सुरु…

666

 प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर –  नुकतीच धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लि. शेंदुर्णी या संस्थेची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक सन २०२३ – २०२८ ही दि.३१/१२/२०२३ रविवार रोजी होऊ घातलेली आहे. या निवडणुकीत संस्थेचे चेअरमन मा.श्री.संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वात “आचार्य विद्या विकास पॅनल” ची स्थापना झालेली आहे. या पॅनलचा प्रचार नारळ शेंदुर्णी येथील काशीविश्वेश्वर (विजदेवळी) मंदिर येथे  दि.२१ रोजी पॅनलचे सर्व उमेदवार व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी आचार्य विद्या विकास पॅनलचे सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार संजय भास्करराव गरुड, सागरमल मिश्रीलाल जैन, किशोर मानसिंग पाटील, रघुनाथ नीलकंठ पाटील, भीमराव शामराव शेळके, राजेंद्र भीमराव शेळके तसेच वि.जा.भ.ज. मतदारसंघातील उमेदवार उत्तमसिंग उमेदसिंग पाटील यांचेसह शेंदुर्णी फ्रुटसेल सोसायटीचे संचालक दिनेश पाटील, प्रा.चंद्रशेखर पाटील, अशोक मराठे, जयपाल गरुड आदी उपस्थित होते.