शेंदुर्णी दुरक्षेत्र हद्दीतील “अट्टल हातभट्टी विक्रेता” अखेर MPDA अंतर्गत “स्थानबद्ध”

438

प्रतिनिधी पहुर ता. जामनेर –    पहूर पो. स्टे. हद्दीतील मौजे- चिलगाव तालुका, जामनेर येथे राहणारा इसम नामे- सुपडू बंडू तडवी वय वर्ष 42, हा कित्येक वर्षापासून गावठी हातभट्टी बेकायदेशीरित्या उत्पादन करून विक्री करत होता. त्याचेवर आज पावतो पोस्टे पहुर येथे 20 चे वर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर इसमावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 93 अन्वये यापूर्वी प्रतिबंधित करण्यात आले होते. मात्र सदरचा इसम कायद्याला न जुमानणारा होता. त्या अनुषंगाने पहुर पो .स्टे. कडून त्यास एम पी डी ए कायद्याअंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री. एम राजकुमार सो यांनी माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रतिबंधित इस्मास एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश प्राप्त होताच, जिल्हा मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे स्थानबद्ध करून दाखल करण्यात आले आहे. सदरचा प्रस्ताव पो .स्टे. पहुर येथून दिनांक 05/12/23 रोजी मंजुरी करिता वरिष्ठ कार्यालयाचे मार्फतीने सादर केला होता. सदर कारवाई मा. श्री. एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक सो जळगाव, माननीय श्री. रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ. माननीय श्री. धनंजय येरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग, माननीय श्री. किसनराव नजन पोलीस निरीक्षक स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली पहुर पो. स्टे. कडील पो. नि. श्री. सचिन सानप, पीएसआय श्री. संजय बनसोड, पीएसआय श्री. दिलीप पाटील,सहायक फौजदार शशिकांत पाटील, हेडकॉन्स्टेबल विरणारे,पो.काॅ- जिजाबराव कोकणे, ज्ञानेश्वर ठाकरे, विजयकुमार पाटील यांनी पार पाडली.