पाचोरा पोलीस कर्मचारी राहुल बेहरे व विश्वास देशमुख यांच्या सतर्कतेमुळे एकाचे प्राण वाचले-एका वर्षात २ जीव वाचाविण्यात यशस्वी

266

 

पाचोरा प्रतिनिधी –
पाचोरा पोलीस स्टेशनला गेल्या पाच वर्षापासून कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल श्री राहुल बेहरे यांची पाचोरा तालुक्यातील नव्हे तर जळगाव जिल्ह्यात दांडगा संपर्क असून पोलीस खात्यातील माणुसकी जपणारा पोलीस असून प्रत्येक नागरिका मध्ये मिसळणारा व तरुण वर्गात सर्वांना हवाहवासा वाटणारा असे व्यक्तिमत्त्व श्री राहुल बेहरे असून पाचोरा तालुक्यात कुठेही काही भानगड असो कुठेही लग्नाचा कार्यक्रम असो प्रत्येक ठिकाणी त्यांची हजेरी प्रत्येकाशी त्यांचे संबंध असून त्यांनी कधीही माणुसकी जोडली मैत्री जोडली आजात शत्रू म्हणून त्यांची ओळख असून पोलीस खात्यातील प्रत्येकाच्या सुखदुःखात धावणारा व्यक्ती आहे त्यांच्या शब्दाला एवढी किंमत आहे जो व्यक्ती वादग्रस्त असेल तो सुद्धा त्याच्या शब्दाला किंमत देतो ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी 151 लोकांनी रक्तदान करून पाचोरा शहरात विक्रम केला होता त्यामुळे त्यांचे खरोखर चाहते वर्ग असून गुन्हेगारांना सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असतात कधीही जात पात न पाहता सर्वांच्या मदतीसाठी हजर असतात त्यांची लोकप्रियता एवढी आहे प्रत्येक व्यक्ती त्यांना मनापासून मानतो पाचोरा कुठेही काही घटना घडो श्री राहुल बेहेरे यांना लगेच फोन येतो व त्या क्षणी कुठलाही विलंब न लावता आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व माहिती देऊन त्या स्पॉटवर पोहोचतात अशातच दिवाळीची धामधूम असताना अचानक पोलीस स्टेशनला एक महिला पोलीस स्टेशनला आली व त्यांनी सांगितले माझ्या मुलाने मोबाईलवर मेसेज पाठवला आहे मी आत्महत्या करीत आहे असा त्या आजीचे सर्व ऐकल्यानंतर श्री राहुल बेहेरे व पोलीस कॉन्स्टेबल श्री विश्वास देशमुख यांनी आपल्या काही ग्रुप वर मेसेज टाकून माहिती मागवली व त्यांना लागलीच बिंल्दि पुलाजवळ एक व्यक्ती फिरत आहे असा संदेश आला श्री राहुल यांनी त्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना सूचना दिल्या यावेळी आत्महत्या करणारा व्यक्ती हा मानसिक तणाव मध्ये होता त्यांनी कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता नदीमध्ये उडी मारली त्यावेळी त्या लोकांनीही त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले व त्या क्षणी लागलीच श्री राहुल बेहरे व श्री विश्वास देशमुख त्या ठिकाणी पोचले त्या मुलाला वाचवण्यासाठी नदीमध्ये उडी मारणारे पप्पू भाऊ सिंग मोरे सुकलाल भिल्ल बापू प्रल्हाद सोनवणे या तिघांनी आपल्या जीवाची परवा न करता त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी नदीत उडी मारून बाहेर काढले व नंतर त्याला सरकारी दवाखान्यात ऍडमिट करून त्याच्यावर उपचार करून त्याला सुखरूप त्याच्या आईच्या स्वाधीन केले केले त्याचे प्राण वाचवण्याचे खरे श्रेय श्री राहुल बेहेरे व श्री विश्वास देशमुख यांच्या सतरतेमुळे त्यांचे प्राण वाचले आहे त्यांच्या सत्कार करताना शेख जावीद पत्रकार पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती मोरे समीर पाटील योगेश पाटील विनोद बेलदार सत्कार केला आहे देव तारी त्यास कोण मारी पोलीस आहे आपल्या सुरक्षेच्या दारी तेच खरी नागरिकांचे कैवारी.