जलगांव तरुणीचा मोबाईल हिसकावणा-याची कारागृहात रवानगी

263

 

जळगाव प्रतिनिधि –  मेहरुण तलाव परिसरात फिरायला आलेल्या तरुणास मारहाण करत त्याच्या मैत्रीणीचा मोबाईल हिसकावून पळणा-या टोळक्यातील तिस-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने सुरत येथून मध्यरात्री अटक केली त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास महाविद्यालयीन तरुण त्याच्या मैत्रीणीसह मेहरुण तलाव परिसरात फिरायला गेला होता. त्यावेळी राहुल गवळी (गवळी वाडा तांबापुरा जळगाव), शोएब शेख (टिपु सुलतान चौक तांबापुरा जळगाव), शकील शहा रुबाब शहा (तांबापुरा जळगाव) हे तिघे जण मोटारसायकलने तेथे आले होते. त्यांनी तरुणास चॉपरचा धाक दाखवून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील राहुल व शोएब या दोघांना यापुर्वी अटक करण्यात आली होती
तिसरा फरार आरोपी शकील शहा रुबाब शहा यास पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, मिलींद सोनवणे, किशोर पाटील व सचिन पाटील यांच्या पथकाने सुरत येथून शिताफीने अटक केली त्याला न्यायालयात हजर केले असता त्याच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आले. शकील शहा याच्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनला यापुर्वी लुटीचे तिन गुन्हे दाखल आहेत