जामनेर पोलिसांची तालुक्यातील अवैद्य धंद्यांवर धडक कारवाई ,15 अवैध धंदेवाईकांवर गुन्हे दाखल ,4लाख 28 हजारांचा मुद्देमाल जागेवर नष्ट

109

जामनेर प्रतिनिधी:- जामनेर पोलिसांनी तालुक्यातील अवैध गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त करून तब्बल 4 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जागेवर नष्ट करण्यात आला आहे. या कारवाई मुळे अवैध धंदेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे.गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर जामनेर पोलीस प्रशासनाने केलेल्या या कारवाई मूळे नागरिकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक-रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी-भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक-किरण शिंदे यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक-दिलीप मोहिते यांनी तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे.

पोलीस प्रशासना कडून प्रथमच अवैध धंद्यांवर मोठ्या स्वरूपात कारवाई करण्यात आल्याने जामनेर तालुक्यातील सुज्ञ नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक-किरण शिंदे तसेच पोलीस उपनिरीक्षक-दिलीप मोहिते यांनी आपल्या काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तालुक्यातील फोफावले अवैध धंदे बंद करण्यासाठी पाऊल उचलले आहे.याची प्रचिती तालुक्यातील खालील ठिकाणी पोलीस प्रशासनाने अवैध गावठी दारू बनविणाऱ्या ठिकाणांवर धडक कारवाई करून ती ठिकाणे उध्वस्त केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या अवैध व्यावसायिकांची नावे ..

(1)विकास रमेश खामकर, बजरंग पुरा जामनेर (2)  रामकृष्ण सोनू भिल,रा-गारखेडा,ता-जामनेर (3)भरत दामू भिल,रा-गारखेडा,ता-जामनेर (4)दिपक नथ्थु ठाकरे,रा-गारखेडा,ता-जामनेर (5)रमेश सखाराम भिल,रा-हिंगणे बु.! ता-जामनेर,(6)आत्माराम तुळशीराम पवार,रा-गाडेगाव,ता-जामनेर (7)शिवलाल किसन गायकवाड,रा-करमाड,ता-जामनेर,(8)बाबुलाल किसन गायकवाड, रा-करमाड,ता-जामनेर,(9) रविंद्र रंगनाथ सुरवाडे,रा-शहापूर,ता-जामनेर,(10) विमलबाई रामदास भिल,रा-शहापूर,ता-जामनेर,(11)ईश्वर मकडू भिल,रा-खडकी,ता-जामनेर,(12)ज्ञानेश्वर शांताराम राठोड,रा-कापुसवाडी,ता-जामनेर,(13)हरदास जगदेव बेलदार,रा-कापुसवाडी,ता-जामनेर,(14)सोपान अशोक कोळी,रा-कापुसवाडी,ता-जामनेर,(15) धनसिंग धिरसिंग राठोड,रा-कापुसवाडी,ता-जामनेर,या सर्वांवर जामनेर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांकडून तब्बल 4 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ते सर्व रसायन जागेवर नष्ट करण्यात आले.गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर जामनेर पोलीस प्रशासना कडून अचानक झालेल्या या धडक कारवाई मूळे  अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र दिसून येत आहे.जामनेर पोलीस प्रशासना कडुन करण्यात आलेल्या कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत आहे.