लोहारा परिसरात माणुसकी समूहातर्फे विविध वृक्षांचे वृक्षारोपण

282

लोहारा ( दिनेश चौधरी )-
कोरोनाने या दोन वर्षात आपल्याला भरपूर शिकवल.तसेच राज्यात व जिल्ह्यात आँक्सिजन च्या तुटवड्यामुळे ही भरपूर जणांना आपला जिव गमवावा लागला आहे.झाडांची होणारी कत्तल याचे हे दुष्परिणाम आहेत झाडे हे आँक्सिजन देण्याचे काम करतात आणी झाडांमुळे आपल्याला आँक्सिजन मिळण्यास मदत होते.हा विषय मनी धरुन वृक्षसंवर्धन सप्ताहात आपले ही योगदान व्हावे या उद्देशाने माणुसकी रुग्णसेवा समूह तर्फे समाजसेवक गजानन क्षीरसागर,राजू नाईक यांच्याकडून आज दि.2 जुलै रोजी लोहारा परीसरात अशोका,चांदणी, मोगरा, गुलाब,निम,पिंपळ, अशा प्रकारची,२५ वृक्ष लाऊन त्यांना पाणी घालुन ते जगवण्याचा निर्धार करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे .माणुसकी समूह व सुलक्ष्मी सेवाभावी संस्था वेळोवळी समाज उपयोगी उपक्रम राबवीत असतात.यावेळी सहाय्यक फौजदार श्री उदय बाळकृष्ण कुलकर्णी साहेब लोहारा पोलीस दूरक्षेत्र यांच्या हस्ते वृक्षारोपनाला सुरुवात करण्यात आली, माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर, राजू नाईक,सरदार नाईक,धर्मराज नाईक, अशोक चौधरी, अमोल माळी, मोहाडी व लोहारा येथील माणुसकी ग्रुप सदस्य व गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

वृक्षारोपण काळाची गरज माणुसकी समुहाचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी
लोहारा गावातील माणुसकी ग्रुप सदस्य यांनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, त्यांचा उत्साह जबरदस्त होता वतीने मी उत्साहाने समाज कार्य करत असतात वृक्षारोपण काळाची गरज असून त्याची भरपूर फायदे आहेत. भावी पिढीसाठी ही एक शिदोरी आहे ती आपण जपली पाहिजे.
श्री उदय बाळकृष्ण कुलकर्णी.
सहा फौजदार लोहारा पो.स्टे दूरक्षेत्र