शेंदुर्णी येथे सुरू असलेल्या शिवपुराण कथेला भाविकांची अलोट गर्दी

103

शेंदुर्णी –सिहोर येथील परमपूज्य प्रदिप जी मिश्रा यांचे शिष्य पंडित श्री हिमांशू जी तिवारी सिहोर वाले यांच्या अमृतवाणी ने शिवपुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी महाराजांनी सागितले शिवपुराण कथेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेले शिवमंदिरात रोज शिवरात्री चे स्वरूप प्राप्त झाले आहे , असाह्य व्यक्तीला सहाय्य करत राहिले पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वराचा वास असतो त्यामुळे आपल्या वाणीने परमेश्वराचे नाव घेतले पाहिजे महाराज पुढे म्हणाले जीवनामध्ये संपत्ती कमावत असताना आपण परमेश्वराचे नाव घेत नाही जीवन केव्हा संपेल याची शाश्वती नाही म्हणून परमेश्वराचे नाव घेत राहिले पाहिजे मन एकाग्र करून सत्संग केला पाहिजे सत्संग मुळे आपल्या शरीरातील दोष नाहीसे होतात महाराजांनी १ मुखी रुद्राक्ष ते १४ मुखी रुद्राक्ष यांचे काय उपयोग आपल्या जीवनात होता हे सांगीतले तसेच यावेळी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता . यावेळी सुंदर अशी झॉकी नृत्य सादर करण्यात आले त्यावेळी कथेमध्ये उपस्थित भक्तगण भक्ती रसात दंग होऊन नाचत होते, मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली भाविकांना प्रसाद वितरण करण्यात .