मेणगाव विकासो बिनविरोध !चेअरमनपदी शेख शफी शेख उस्मान,तर व्हा.चेअरमनपदी सौ.लक्ष्मीबाई संतोष गायकवाड यांची सर्वानुमते निवड

270

 

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) मेणगाव, ता.जामनेर या आदर्श गावी येथील विकासोची निवडणूक अगदी बिनविरोध तर झालीच,शिवाय आज दि.24 रोजी सस्थेच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाचीही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की मेणगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. या संस्थेच्या नोंदणीकृत उपविधीतील तरतुदीनुसार आज 24 एप्रिल रोजी संस्थेच्या कार्यलयात चेअरमन, व व्हा चेअरमन यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी येथील तरुण तफडदार सामाजिक कार्यकर्ते शेख शफी,शेख उस्मान यांची,तर येथील आदर्श शेतकरी संतोष रामचंद्र गायकवाड यांच्या धर्मपत्नी सौ.लक्ष्मीबाई संतोष गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित सदस्य श्री सुरेश नारायण पाटील,दिनेश सोनजी चौधरी, गोपाळ विठ्ठल पाटील,सुरेश उत्तम वाकेकर, राजू सबा पाटील,प्रकाश मुरलीधर पाटील,ताथुबा शंकर कोळी,सौ.इंदूबाई पंडित कोल्हे, सुनील त्र्यंबक मेढे,बाळू भागवत धुमाळ यांनी चेअरमन व व्हा चेअरमन यांचे स्वागत केले.
या निवडणुकी करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.आर.एस. तायडे,संस्थेचे सचिव संजय अभिमान पाटील यांनी काम पाहिले तर ,शिपाई माधव चिंधु मेढे यांनी मदत केली.
या निवडणुकीसाठी येथील
माजी सरपंच श्री सुरेश नारायण पाटील,मा. सरपंच श्री बाळु भागवत धुमाळ. विलास शांताराम पाटील यांनी परिश्रम घेतले.