अमळनेर येथे 6 लाखांचा गांजा पकडला पंचायत समिती सदस्य पतीसह तीन अटकेत

208

जिल्हा प्रतिनिधी –  चोपडा ते धरणगाव रोडवर अमळनेर पोलिसांनी एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून वाहून नेला जाणारा तब्बल सहा लाख रूपयांचा गांजा जप्त केला असून तीन आरोपींना गजाआड केले आहे. आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.अमळनेर पोलिसांना धरणगाव ते चोपडा रोडने काही इसम कारमधून गांजा हा मादक अमली पदार्थ कब्जात बाळगुन तिची वाहतुक करत आहेत, याबाबत गोपनीय माहीती मिळाली होती.यानुसार डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. यात चोपडा ते धरणगाव रोडवर हाटेल इंद्रायणी समोर रोडवर उभे राहुन वाहने चेक करत असताना धरणगाव कडुन चोपड्याकडे जाणारी एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम.एच .०१ बी.टी. ०५०९ ही आली. या कारबाबत संशय आल्याने पोलिसांनी कार चालकासह सोबत चालणार्‍या मोटर सायकल स्वाराला पकडले.यात आकाश रमेश इंगळे (वय २२ रा. मरीमाता मंदिराजवळ एरंडोल; शकील खान अयुब खान (वय ४२ रा.इस्लामपुरा,कासोदा) आणि सतीश बापु चौधरी (वय ३६ रा.मरीमाता मंदिराजवळ एरंडोल) अशी असल्याचे सांगितले. या आरोपींकडून सहा लक्ष रु. किंमतीचा ३९ किलो ८०० ग्रॅम वजनाचा २० गांजा, चार लक्ष रुपये किमतीची एक स्विफ्ट कार व ५०,०००/- रुपये कि.ची एक दुचाकी असा एकुण साडेदहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला होता.