रामदेव बाबा जयंती निमित्त मोहाडी येथे मोफत आरोग्य निदान व रक्तदान शिबिर संपन्न

171

 

विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व माणुसकी रुग्णसेवा समूह यांचा संयुक्त उपक्रम

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी )
मोहाडी ,ता.पाचोरा येथे दिनांक १६/०९/२०२१ वार-गुरुवार रोजी पाचोरा येथील सुपरिचित विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य निदान व रक्तदान शिबिर आज रोजी पार पडले. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे संचालक डॉ.भूषण दादा मगर, माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर, दत्तात्रय तेली, देविदास सावळे, उपस्थित होते,
रक्तदात्यांची नावे पुढील प्रमाणे.
विकास नाईक,नितीन पाटील,रणछोड राठोड,रवींद्र पाटील,कैलास महाजन,राजू नाईक,योगेश जाधव,
किसन जाधव,भगवान जाधव,किसन चव्हाण यांनी रक्तदान केले, आरोग्य शिबिरामध्ये गावातील महिला, पुरुष रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली. विघ्नहर्ता हॉस्पिटल चे डॉ साहिल पिंजारी, डॉ प्रकाश चव्हाण ,डॉ मनोज कासार,परिचारक अक्षय संजय, शुभांगी जंगले,भारती पवार यांनी तपासणी केली. रक्त संकलनाची कार्य प्लस बँक जळगाव डॉक्टर अमोल शेलार, डॉक्टर वीरेंद्र बिराडे, डॉक्टर सलमान पटेल, डॉक्टर नीलेश घोंगडे, डॉक्टर जाधव, डॉक्टर रहमान शहा यांनी मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू नाईक, किसन चव्हाण, गोकुळ जाधव, सतीश नाईक,बद्रीनाथ नाईक, अक्षय नाईक, ईश्वर नाईक प्रदीप नाईक, निलेश नाईक, युवराज जाधव सर्व ग्रामस्थ मोहाडी व माणुसकी ग्रुप सदस्य यांनी परिश्रम घेतले.