धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी. लि. चा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

121

दि. १७ जुलै शेंदुर्णी : धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचा ७९ वा वर्धापन दिन सोहळा आणि ज्यांनी या संस्थेची मुर्हूतमेढ रोवली असे संस्थेचे संस्थापक, सहकार महर्षी कै. आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण अप्पासाहेब र. भा. गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या दर्शनी भागात कबचौ उमवि चे प्रथम कुलगुरु डॉ एन के ठाकरे यांच्या हस्ते आणि शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन दादासो संजयजी गरुड, सचिव सतीष चंद्र काशिद, सहसचिव भाऊसो दिपकजी गरुड, संचालिका उज्वलाताई काशिद, माजी जि. प. सदस्य सौ. सरोजिनीताई गरुड, श्री अंबरीश गरुड, श्री महेश गरुड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. परिसरात रा.से.यो. एकाका मार्फत वृक्षारोपण करण्यात आले.तत्पुर्वी अप्पासाहेब गरुड यांच्या पुतळ्याची विधिवत पूजा संस्थेचे सचिव मा. सतिषजी चंद्र काशिद आणि संचालिका सौ. उज्वलाताई काशिद यांनी संस्थेचे चेअरमन मा. संजयजी गरूड, सौ. सरोजिनीताई गरुड, सौ. संगीताताई गरुड सोबत संस्था पदाधिकारी तसेच मा.पंडीतदादा गरुड, पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील, श्री महेशभाऊ गरुड, श्री. अंबरीष गरुड, श्री. कैलास देशमुख, श्री सुहास वाबळे, सौ. विभाताई वाबळे, श्रीमती जयश्री देशमुख, डॉ. अजय सुर्वे यांच्या उपस्थितीत पार पडली.

वर्धापन दिन सोहळ्याची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच प्रतिमा पुजन करण्यात आली. आ.ग.र.ग.माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायिले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शाम साळुंखे यांनी प्रास्ताविकातून आयोजनामागचा उद्देश विषद केला. क.ब.चौ. उ.म.वि.चे प्रथम कुलगुरू मा.डॉ.एन.के.ठाकरे यांचा संस्था पदाधिका-यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यासह पुतळा उभारणीत महत्वाची भूमिका बजावणारे प्राचार्य अतुल मालखेडे (शिल्पकार) तसेच वास्तुविशारद सौरभ जैन यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी चित्रकला, विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. श्री. डी.बी. म्हस्के यांनी गुणवंत विद्यार्थ्यांची पारितोषीक जाहीर करत मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण केले. शुद्धलेखनासाठी विदयार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यानी वक्तृत्व सादर केले. त्यात कु. समृद्धी पतंगे, कु.अक्षरा गरुड यांचे वक्तृत्व प्रभावी ठरले. जेष्ठ संचालक मा. श्री. सागरमलजी जैन यांनी अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांच्या कार्य कर्तृत्वाचा वेध घेतला. प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे हे विद्यापीठाचा पाया रचणारे जणू ज्ञानेश्वरच आहेत या स्वरुपाचा गौरव त्यांनी मनोगतातून केला. सोहळ्याचे निमंत्रक धी शेंदुर्णी सेकं. एज्यू.को-ऑप संस्थेचे सचिव श्री. सतीष चंद्र काशीद यांनी आपल्या भाषणातून आलेल्या मान्यवरांप्रती व सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत सर्वांबाबत ऋणभावना व्यक्त केली. प्रथम कुलगुरु प्रमुख अतिथी डॉ. एन. के. ठाकरे यांनी आप‌ल्या भाषणातून सुलभ बोधकथा सांगून उपस्थितांचे उदबोधन आपल्या अनोख्या शैलीतून केले. जीवनात प्रगती करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही तसेच देशाची संपत्ती बुद्धीजीवी वर्गच असून कष्ट करणाऱ्या हातांमुळेच देशाचे उत्पन्न वाढते असे मार्गदर्शन त्यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासो संजयजी गरुड यांनी अध्यक्षीय मनोगतातून संस्थेच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. अप्पासाहेब गरुड यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रित्यर्थ त्यांनी जिल्हयातील सहकार क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाचा गौरव केला. या प्रसंगी मा. संस्थेचे संचालक श्री यु. यु. पाटील, माजी मुख्याध्यापक श्री डब्ल्यू.एस. पाटील, माजी मुख्याध्यापक श्री सुनील राठी, गोविंदजी अग्रवाल, सुधाकरजी बारी, डॉ. किरण सूर्यवंशी श्री प्रभाकर सपकाळ, श्री धीरज जैन, रा.दे. निकम, प्रा.सुनिल गरूड, योगेश गुजर, श्री.अंबरीश भाऊ गरूड, श्री महेश गरुड, उपप्राचार्य डॉ. संजय भोळे, धी शेंदुर्णी सोसायटीचे चेअरमन सतिश बाविस्कर, पत्रकार – देवेंद्र पारळकर, अतुल जहागीरदार, विलास अहिरे, दिग्विजय सूर्यवंशी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापकवृंद, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच पालक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बापूसाहेब गजाननराव गरूड फाउंडेशन, धी शेंदुर्णी कर्मचाऱ्यांची सह. पतसंस्था यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सुत्रसंचालन श्री पी.जी.पाटील तर आभार प्राचार्य एस. पी. उदार सर यांनी मानले .