लोहारा ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेचा बनावट ठराव करून नमुना नंबर 8 अ चे बोगस उतारे बनवून 432 लोकांची कागदोपत्री तसेच आर्थिक फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल

551

 

लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव येथील ग्रामपंचायतीने
तत्कालीन सरपंच मालतीबाई संजय पाटील, तत्कालीन उपसरपंच
कैलास संतोष चौधरी, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी
श्री.आर.टी.बैसाने व संगणक चालक प्रल्हाद नामदेव चौधरी यांनी
संगनमताने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा प्रोसेडींग मध्ये बनावट ठराव
टाकुन त्याचा आधार घेवून ग्रामपंचायतीचा नमुना नं.८ अ बनवुन
देतो म्हणुन ग्रामस्थाकडून पैसे स्विकारुन बनावट उतारे ग्रामपंचायत
निवडणुकीच्या आधी प्रचारादरम्यान दिल्या प्रकरणी पोलीस स्टेशन
पिंपळगाव हरेश्वर येथे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सविस्तर माहीती अशी की, माजी सरपंच अक्षयकुमार
उत्तमलाल जैस्वाल यांनी दि.५/१/२०२१ रोजी माहिती अधिकार
कायदा २००५ नुसार सदर विषयाची माहिती ग्रामपंचायत लोहारा
यांचेकडून प्राप्त केली त्यानंतर दि.४/२/२०२१ रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साो.जि.प.जळगाव यांचेकडे लोहारा ग्रामपंचायतीच्या
तत्कालीन प्रशासक श्री.सैदाणे विस्तार अधिकारी पंचायत समिती
पाचोरा यांचे कार्यकाळात दि.२६/१/२०१९ रोजी झालेल्या ग्रामसभेच्या
ठराव क्र.६ व ७ मध्ये बनावट कागदे टाकुन बनावट व बेकायदेशीर
ठराव लिहीण्यात आले प्रोसेडिंग बुकात फेरफार बुकात खाडाखोड
करुन त्याचा आधार घेवून ग्रामपंचायतीचा नमुना नं.८ अ चे
मालकी हक्क दाखविणारे ग्रामपंचायत मालकीच्या व सरकारी मालकीच्या जागेंचे ७/१२ उतारे तयार करुन लोहारा ग्रामस्थांना
ग्रामपंचायतीच्या दि.१५/१/२०२१ रोजी झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीच्या
आधी प्रचारादरम्यान मतदारांना देण्यात आल्याबाबत व त्यांचेकडून
करोडो रुपये वसुल केल्याबाबत तक्रार दाखल केली होती. सदर
मुख्य
तक्रारीची दखल घेवून म मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी पारदर्शक
व्हावी म्हणुन श्री.नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी चाळीसगाव
यांचेकडे दिली. त्यांनी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे
आदेश दिले. त्यांनी लोहारायेथे जावुन दि.२६/३/२०२१ रोजी चौकशी
अहवाल मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला असता
मा.उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दि.६/४/२०२१ रोजी म.गटविकास
अधिकारी साो.पाचोरा यांना आलेल्या चौकशी अहवालानुसार
संबंधीताविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतू कुठलीही कारवाई
न झाल्याने तक्रारदार यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारवाई
न झाल्याबाबत फौजदारी कारवाई व्हावी म्हणुन पत्र व्यवहार केले.
त्यानंतर म.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार
दि.१०/६/२०२१ रोजी पत्र देवून दि.२६/१/२०१९ रोजी झालेल्या
तत्कालीन प्रशासक श्री.सौदाणे यांचे प्रशासक काळात झालेल्या
बनाकठरावानुसार ग्रामपंचायत नमुना नं.८ अ जागा क्र.२३४९ 2/3
२७८१ पर्यंतचे सर्व नमुना नं.८ चे नियमबाह्य बनावट उतारे रद्द
करणेबाबत गटविकास अधिकारी पाचोरा यांना आदेश दिले. त्याअनुशंगाने पाचोरा गटविकास अधिकारी यांनी सरपंच ग्रामपंचायत लोहारा यांना दि.१५/
६/२०२१ रोजी बनावट झालेले सर्व नमुना नं.८ चे उतारे रद्द
करण्याचे आदेश दिले.
त्याअनुशंगाने ग्रामपंचायतीने दि.१८/६/२०२१ रोजी मासिक ठराव क्र.४/
१ नुसार नमुना नं.८ अ, बनावट नोंद वहीतील ४३२ उतारे रद्द करण्यात
आले व ग्रामपंचायतीने एकमताने ज्या लोकांनी बनावट उतारे तयार
केले त्यांचे विरुध्द फौजदारी कारवाई व्हावी म्हणुन म.मुख्य कार्यकारी
अधिकारी यांना दि.२२/६/२०२१ रोजी पत्र देवून अवगत केले. त्यानंतर
म.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दि.३०/६/२०२१ रोजी गटविकास
अधिकारी यांनी शासन परिपत्रकाप्रमाणे संबंधीत बनावट दस्त तयार
करणारे संबंधीताविरुध्द कारवाई आदेश दिले. त्याअनुशंगाने दि.१८/८/२०२१ रोजी म.गटविकास अधिकारी पाचोरा यांनी लोहारा ता.पाचोरा सरपंच/ग्रामविकास
अधिकारी यांना आदेश देवून दि.२६/१/२०१९ रोजी झालेल्या ग्रामसभेच्या
ठरावा संदर्भात बनावट तयार करण्यात आलेले ठरावाचा आधार घेवून
तयार करण्यात आलेल्या नमुना नं.८ अ चे उतारे देवून ग्रामस्थांची
झालेले आर्थिक फसवणुक पाहता फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत
अधिकारपत्र देवून प्राधिकृत केले. त्यानुसार दि.१८/९/२०२१ रोजी
म.गटविकास अधिकारी पाचोरा यांनी दिलेल्या अधिकारपत्रानुसार
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे एफ.आय.आर नं.२६८/२१ नुसार
ग्रामपंचायतीच्या प्रोसेडींग बुकात बनावट कागदपत्रे समाविष्ठ करणे
दप्तरात फेरफार करणे, बनावट कागदपत्र तयार करणेबाबत व
ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीकडे आलेल्या त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार
त्यांची झालेली आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सरपंच अक्षयकुमार उत्तमलाल
जैस्वाल यांचे फिर्यादीवरुन दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा श्री.भरत काकडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (हरे) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कृष्णा भोये व त्यांचे सहकारी करीत आहे. आता पोलीस काय कार्यवाही करतात याकडे लोहारा आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.