होमिओपॅथीच्या औषधांनी अपंगत्वावर मात, होमिओपॅथी तज्ञ डॉ. उर्मिला नवाल यांच्या प्रयत्नांना यश

327

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी  – शेगाव येथील वेदांत गजानन आढाव याला मसल एट्रोपी म्हणजेच शरीरातील स्नायू कडक बनण्याचा आजार झालेला होता. त्यामुळे त्याची शरीराची हालचाल हळूहळू कमी व्हायला लागली. स्नायू मध्ये तन्यता कमी झाली. ओघानेच हरूदयाची ही स्थायू ची लवचिकता कमी होऊन जीवाला धोका होण्याची संभावना वाढली .
त्याचे अपंगत्व पाहून शेगाव येथील लिनन क्लबने त्याला तीन चाकी सायकल भेट दिली .योगा योगाने त्या कार्यक्रमात होमिओपॅथी तज्ञ डॉ उर्मिला नवाल उपस्थित होत्या .त्या मुलाची अवस्था बघून त्यांनी त्याला औषधोपचारासाठी दत्तक घेतले .होमिओपॅथिक औषधांचा वापर सुरू करीत हळू हळू मसल एटरोपी आजाराचा विळखा कमी व्हायला लागला आता तो काही पायऱ्या चढायला लागला. सदर मुलाच्या कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत जेमतेम आहे. तरीसुद्धा त्यांनी मुंबई ,नागपूर, अकोला येथील विविध डॉक्टरांना दाखवून औषधोपचार केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही .
शेंदुर्णी सारख्या गावी त्रिविक्रम मंदिर रोड वर स्वतःचे क्लिनिक असलेल्या डा. अल्केश नवाल व डा .उर्मिला नवाल यांनी एका मुलाला औषधोपचारासाठी दत्तक घेऊन जगण्यासाठी बळ व हिम्मत दिली. त्याला आजारावर मात करण्यासाठी प्रयत्न केले. त्या बद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.