दिल्ली येथे कुस्तीत लोहारा येथील तरुणांची चमकदार कामगिरी.दोघही तरुण लोहारा गावचे,रौप्यपदक पटकावून गावाला मिळवून दिला सन्मान

269

 

दिनेश चौधरी,लोहारा (प्रतिनिधी ) लोहारा येथील कै. लोटू नारायण चौधरी यांचे नातू केदान्त विजय चौधरी ह व राजेंद्र रवींद्र भोई या या महाविद्यालयीन तरुणांनी दिल्ली येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत लोहारा गावचे नाव उजवल केले आहे.आणि गावास लौकिक ही मिळवुन दिला आहे.विशेष म्हणजे हे दोघेही
शेंदुर्णी येथील आ. र. भा.गरुड महाविद्यालया शिक्षण घेत आहे.या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले आहे.
दि.22 रोजी दिल्ली येथे इंदिरा गांधी नशनल स्टेडियम येथे झालेल्या राष्ट्रीय ग्राफलींग कुस्ती स्पर्धेत आ.र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयशेंदुर्णी , व मुळगाव लोहारा ,ता.पाचोरा येथील विद्यार्थी राजेंद्र रवींद्र भोई व लोहारा येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी केदांत विजय चौधरी या दोघांना सिल्वर पदक प्राप्त झाले. तसेच या स्पर्धेत 6 खेळाडू यांनी सहभाग घेतला होता. त्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मा. श्री.दादासाहेब संजयरावजी गरुड, सचिव मा. श्री दाजीसो.सतीशजी काशीद, ज्येष्ठ संचालक मा.श्री .सागरजी जैन, सहसचिव मा. श्री. दिपक भाऊ गरुड, महिला संचालिका सौ .उज्वलाताई काशीद, संस्थेचे वस्तीगृह सचिव मा. श्री. कैलास भाऊ देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर. पाटील शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी,तसेच लोहारा येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे डॉ.महेश आर. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.