प्रजा सुराज्य पक्षातर्फे काळ्या फिती लावून सोयगाव तहसिल प्रशासन व मंत्र्यांचा निषेध

143

सोयगाव
प्रजा सुराज्य पक्षातर्फे मंत्री व प्रशासनाचा काळ्या रिबीन लावून बुधवारी (दी.२६) सोयगाव तहसिल कार्यालय आवारात निषेध आंदोलन करण्यात आले.
प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष
शरदजी (अण्णासाहेब) तिगोटे यांनी या निषेध आंदोलनाचे नेतृत्व केले.

सोयगाव शहरातील प्रधानमंत्री आवास योजना परवडणाऱ्या घराच्या घटकातील सर्व लाभधारक प्रधानमंत्री आवास योजना परवडणारी घरे ए एच पी घटकातील घरे मिळण्यासाठी लाभार्थी व प्रजा सुराज्य पक्ष यांच्यासह गेली सात वर्ष संघर्ष करत आहे. मात्र आजपर्यंत सदरील लाभधारकांना अद्याप घर मिळालेली नाहीत.या निषेधार्थ प्रजा सुराज्य पक्षातर्फे मंत्री व प्रशासनाचा काळ्या रिबीन लावून बुधवारी (दी.२६) सोयगाव तहसिल कार्यालय आवारात निषेध आंदोलन केले.

सोयगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय,सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, हे येणार असल्याचे ओचित्य साधून प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष
शरदजी (अण्णासाहेब) तिगोटे यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी काळ्या रिबीन विषयी विचारणा करीत विषयाच्या अनुषंगाने दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाली चर्चा करण्यात आली.त्यांनी विनंती केली आणि परवडणाऱ्या घरांचा विषय तात्काळ मार्गी लावू अशी सकारात्मक भूमिका घेऊन त्यानि प्रजा सुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना आश्वासित केले त्यानंतर काळ्या रीबिनी घालून मंत्रिमहोदयांचा निषेध करण्याचा आंदोलन स्थगित करण्यात आले. आम्ही सोयगाव तालुक्यातील प्रशासन व्यवस्था किती डिम आहे या तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी तहसीलदार, बी डि ओ हे सर्व असवेदनशील असल्याकारणाने जनसामान्यांचे काम होत नाहीत याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही हे आंदोलन पक्षातर्फे करण्यात आले.
– शरदजी (अण्णासाहेब) तिगोटे
प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष

यावेळी सविता शिरसागर, गोपाल आवटे, शफिक शेख, पठाण, रामेश्वर शिरसाठ, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .